बुलढाणामहाराष्ट्र

तक्रारीनंतर स्टेट बँक ऑफ इंडीयाचे प्रशासन नरमले शाखेत २० हजारापेक्षा कमी रक्कम घेण्यास व देण्यास सुरूवात

तक्रारीनंतर स्टेट बँक ऑफ इंडीयाचे प्रशासन नरमले शाखेत २० हजारापेक्षा कमी रक्कम घेण्यास व देण्यास सुरूवात

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकरशेगाव कोणतेही आदेश नसताना ग्राहकांची अडवणूक करून नाहक त्रास देणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया स्थानिक शाखेच्या अधिकाऱ्यांची बँकेच्या वरिष्ठांकडे तक्रार नोंदविताच संबंधितांकडून अडवणूकीचा प्रकार थांबविण्यात आला असून ग्राहकांना पुर्वीप्रमाणे सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.याबाबत असे की, शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दोन्ही शाखांमधून २० हजार किंवात्याखालील रोख रक्कम तेथील शाखाधिकारी घेण्यास नकार देत होते, सोबतच ग्राहक सेवाकेंद्रात जाण्याचा सल्ला सुध्दा द्यायचे. अशाप्रकारे बँकेच्या वरिष्ठ पातळीवरून कोणतेही आदेश नसताना| ग्राहकांना त्रास देण्याचा प्रकार शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दोन्ही शाखांमधून सुरू होता. या नाहीकाच्या त्रासाबद्दल रितेश खेतान यांनी केंद्र सरकारच्या पोस्टरवर व लोकपाल भारतीय स्टेट बँक यांच्याकडे तक्रार करताच २० हजार रुपये पेक्षा कमी रक्कम घेणे व देणे सुरू झाले तसेच शाखेत सुविधा सुरू झाल्यास मेल तक्रारकर्त्याना पाठविण्यात आले अशा प्रकारे नाहक अकरा काना त्रास देणाऱ्या लोकपाल व शाखा अधिकारी विरुद्ध तक्रार नोंदवतात त्यांची दाखल घेण्यात आली व सर्वांच्या सुविधे करिता चार मार्च 2023 पासून बँक परिसरात ग्राहक सेवा केंद्र सुद्धा तत्काळ सुरू करण्यात आले आहे तरी बँकेचे कर्मचारी किंवा अधिकारी यांच्याकडून कायदा सोडून जबरदस्ती कोणतेही आदेश नसताना त्रास दिला जात असल्यास ऑनलाईन तक्रार नोंदवावी असे आवाहनही रितेश खेतान यांनी केले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button