शेगाव शहरातील मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होतील का.?

*मा. आमदार साहेब लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक सौदरीकारण भूमी पूजन कधी.?* .*शेगाव शहरातील मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होतील का.?* . शेगाव :प्रतिनिधी ……….19 फेब्रुवारी रोजी शेगाव शहरात भव्य असा भूमीपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता.शेगाव शहरतील विविध चॊकाचे सौंदरीकारणाचे भूमीपूजन या निमित्याने करण्यात आले होते.आणि ते योग्यच आहे ते करणे आवश्यक ही आहे. परंतु शेगाव शहरातील 1993 आगोदर पासून साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक जाणीव पूर्वक उपेक्षित ठेवण्यात येत आहे. या मध्ये मोठया प्रमाणात राजकारण होत असून मातंग असलेल्या दलित समाजाला हीन दर्जा ची वागणूक देण्यात येत आहे. डॉ अण्णा भाऊ साठे स्मारक सौंदर्यकरण करण्यात यावे करीता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष तथा मातंग समाजाचे कार्यकर्ते गोपाल तायडे यांच्या कडून आमरण उपोषण ही करण्यात आले होते.या उपोषणाची दखल नगर परिषदे कडून घेण्यात आली. व तसा ठराव घेऊन स्मारक सौदरीकरणाला प्रशासकीय मान्यता ही देण्यात आली होती. माननीय आमदार साहेब यांच्या प्रयत्नाने शेगाव शहराच्या विकासा करीता सहा कोटी रु. एवढा निधी आणण्यात आला होता. शेगाव शहरतील विकास कामाला गती देण्याचे काम या निधीतून करण्यात आले.त्या मध्ये शेगाव शहरातील विविध चोका चे सौदरीकरन करण्याचे काम ही होते.परंतु जाणीव पूर्वक द्वेष भावानेतून कोणाच्या सांगण्यावरून डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक सौदरीकर या मध्ये समाविष्ट करण्यात आले नाही. हा जरी संशोधनाचा विषय असला तरी हे सर्व अन्यायकारक आहे. सध्या विधन सभेचे अर्थसंकल्पीय आदिवेशन चालू आहे. दि.22 फेब्रुवारी मातंग समाजाचे मुबई येथे आजाद मैदानावर बार्टी च्या धरतीवर आर्टी स्थापन झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली. त्या मागणीचा धागा पकळत जळगाव जा.मतदार संघाचे मा.आमदार डॉ. संजय कुटे साहेब यांनी मातंग समाजाला मातंग समाजा अ.ब.क.ड. असे वर्गीकर करून बार्टी च्या धरती आर्टी स्थापण झाली पाहिजे अशी मागणी केली खरी.परंतु त्याच्या मतदार संघातील शेगाव शहरातील मातंग समाजाचे खुप सऱ्या अश्या प्रलंबित मागण्या आहेत. जे अजून पर्यंत पूर्ण झाले नाहीत.त्या सर्व मागण्या आमदार साहेब पूर्ण करतील का.? ज्या महापुरुषाने देश्याच्या स्वातंत्र्य लढ्या समेत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सिहंचा वाटा दिला त्या थोर महापुरुषाचे स्मारक सौदरीकरण तीन दशका पासून जाणीव पूर्वक करण्यात येत नाही त्या स्मारकचे सौदरीकरण होणार का? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी केला



