कवठळ येथे स्वाभिमानीच्या वतीने मोफत रोगनिदान शिबीर संपन्न

कवठळ येथे स्वाभिमानीच्या वतीने मोफत रोगनिदान शिबीर संपन्न. संग्रामपूर / शेतकरी व शेतमजुरांच्या हितासाठी सतत लढा देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने युवा विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांचे पुढाकाराने रुग्णांना सुद्धा दिलासा मिळवून उपचार व्हावेत या उद्देशाने कवठळ येथे आज दि ०५ मार्च रोजी विविध आजारांसाठी रोग निदान शिबिर संपन्न झाले. या रोग निदान शिबिराचे अध्यक्षस्थानी सागर मोरखडे होते, तर उद्घाटक म्हणून स्वाभिमानी युवा आघाडीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर होते .व मार्गदर्शक म्हणून मूत्रपिंड मूत्र आणि मुतखडा विशेषज्ञ डॉ. प्रतीक लड्डा होते. प्रथम शिबिराचे उद्घाटन होऊन रुग्णांना विविध आजारांची माहिती देवून मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर मूत्रपिंड मूत्रविकार आणि मुतखडा आणि विविध आजारांनी त्रस्त असलेल्या १८३ रुग्णांची तपासणी अकोला येथील मूत्रपिंड,मूत्र आणि मुतखडा विशेषज्ञ डाॕ.प्रतिक लढ्ढा यांनी केली असून त्यापैकी ग्रस्त २७ रुग्णांना ऑपरेशन साठी अकोला येथे बोलवण्यात आले. यावेळी अकोला येथील डॉ पवन चव्हाण, डॉ मंजुळा राठोड, डॉ समिर अली यांचेसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते, कार्यक्रमासाठी कवठळ येथील स्वाभिमानीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. यावेळी विजय ठाकरे,दत्ता डिक्कर,किष्णा शेजोळे,भगवान पाखरे,पवन वाघ,महेबुब खान, संतोष बघेवार,विठ्ठल संदुके,संदिप बाप्पु, वैभव भामद्रे,संतोष बघेवार, ज्ञानेश्वर संदूके, संदीप देशमुख, फारुख षेठ, राजेंद्र ठाकुर , शेख वसीम शेख लुकमान, संतोष रावनचोरे,मुरली पालिवाल,दिपक देशमुख,बबलु खंडेराव सह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.



