महाराष्ट्रविदर्भ

कोतवाल पदाचे परीक्षा निकालावर आक्षेप असल्या बाबत

भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम : – कोतवाल पदाचे परीक्षा निकालावर आक्षेप असल्या बाबत मालेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देन्यात आले आहे प्रत्येक विद्यार्थ्याने या निवेदनात असे प्रत्येकी नमूद केले की यामध्ये अनेक शंकास्पद गोष्टी घडल्या त्या म्हणजे परीक्षा केंद्रावर जात असताना मोबाईल वॉलेट पर्स अशा पद्धतीची कोणतीही तपासणी केली नाही. त्याचबरोबर उत्तर पत्रिकेसोबत ओ. एम. आर. शीट कॉपी सुद्धा दिली नाही. लगेच सायंकाळी निकाल लागला विद्यार्थ्यांनी आपले गुण तपासले असता या दोन्ही गुणांमध्ये विद्यार्थ्यांना फेरफार आढळला. दि.३०/०७/२०२३ रोजी कोतवाल पदाची परीक्षा दिलेली आहे त्या बाबत निकाल आपण घोषित केलेला आहे तरी माझे आकलनानुसार माझे गुण है गुण बरोबर नाहीत परंतु आपल्या प्रणाली ने मला योग्य गुण दर्शविले नाही,तर उत्तर तालीका परत तपासणी करून माझे उत्तर तालीकेची एक प्रत मला मिळावी ही नम्र विनंती केली आणि योग्य ती कारवाही करून निर्णय घेण्यात यावा उत्तर तालीकेची पूर्ण तपासणी होई पर्यंत अतिम निकाल घोषित करून नये तसेच पुढील प्रक्रिया बाबवावी ही नम्र विनंती ही निवेदनाव्दारे देन्यात आली आहे. जिल्हाधिकारी म्हणाले या प्रकरणाची चौकशी करू आणि चौकशी न करता कोणालाही नियुक्ती दिली जाणार नाही अशा पद्धतीची त्यांनी ग्वाही दिली.
यावेळी निवेदन देते वेळी मालेगाव तालुक्यातील निवेदन करते कुणाल डोंगरदिवे वाघळूत परमेश्वर देवकते मालेगाव ज्ञानेश्वर पंढरी चव्हाण रोल नंबर 75 गाव बोर्डी निलेश प्रभाकर गुडदे सुभाष प्रभाकर गुडदे पवन चौधरी अनिल चौधरी विशाल डंगारे श्रीकांत गुडदे , कांचन गुडदे पूनम कंकाळ अक्षय गावंडे सचिन खडसे संजय लांडकर संतोष ठाकरे दिग्विजय झटे दिनकर देवकते अविनाश झटे पंकज शिंदे अलका शिंदे लक्ष्मी घाटी इत्यादी तरुणांनी कोतवाल भरती च्या गुणपत्रिकेत अपरात फेर केले व मंगेश कांबळे भारतीय विद्यार्थी मोर्चा वाशिम जिल्हा संयोजक त्यांच्या त्या अर्जावर सह्या व मोबाईल नंबर देण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button