महाराष्ट्र

बस स्थानकावर पाकिटमारांचा धमुकुळ घातला पोलीस चौकी बंद असल्यामुळे

बस स्थानकावर पाकिटमारांचा धमुकुळ घातला पोलीस चौकी बंद असल्यामुळे

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर शेगाव येथील बस स्थानकावर पाकिट मारांचा सुळसुळाट सुटला असून ४ मार्च रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास संग्रामपूर तालुक्यातील चोंडी येथील रहिवासी गोपाल मनोहर घारोड हे शेगाव वरून एसटी बसने आपल्या परिवारासह घरी जाण्यासाठी बस स्थानकावर बसमध्ये चढत असताना, घारोड यांच्या पँटच्या खिशातून तीस हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. घटना ४ मार्च रोजी शेगाव बस स्थानकावर घडली आहे.शेगाव बस स्थानकावर वारंवार पाकीटमारीच्या व मोबाईल चोरीच्या घटना सतत घडत आहेत. बस स्थानकावर पोलीस चौकी आहे, परंतु मागील दोन महिन्यापासून ही चौकी बंद असल्याचे शेगाव बस आगार कर्मचाऱ्यांनी सांगितले.काही दिवसापूर्वी पत्रकार संजय सोनोने यांच्या चोर खिशातून ९ हजार रूपये याच बस स्थानकावर बस मध्ये चढत असताना चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button