सोमठाणा ते सावंगीच्या मध्ये रेल्वे क्रॉसिंग जवळ टू व्हीलर ची समोरासमोर धडकून एक ठार एक गंभीर जखमी

*सोमठाणा ते सावंगीच्या मध्ये रेल्वे क्रॉसिंग जवळ टू व्हीलर ची समोरासमोर धडकून एक ठार एक गंभीर जखमी
*दि 3/3/23 सविस्तर वृत्त असे की सोमठाणा जवळ असल्या रेल्वे क्रॉसिंग जवळ टू व्हीलर चे समोरासमोर धडक झाली धडक एवढी जबरदस्त होती की दोघांच्याही डोक्याला जबरदस्त मार लागला होता. सुधाकर पापळकर रा हातोला हे कारंजा वरून हातोल्याला जाण्यासाठी निघाले होते. व त्यांच्या विरुद्ध दिशेने नामदेवराव ढळे वय 40 हे दिघी ला जाण्यासाठी निघाले होते. अपघाताची माहिती तात्काळ बोधेगाव येथील आशिष मेडिकलचे संचालक आशिष भाऊ राऊत यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली त्यांनी तात्काळ समृद्धी रुग्णवाहिकेचे अजय घोडेस्वार यांना तात्काळ फोन तरी माहिती दिली तात्काळ अजय घोडेस्वार घटनास्थळी जाऊन जखमी रुग्णाला उपजिल्हा रुग्णालयाचे दाखल केले. पण वैद्यकीय अधिकारी यांनी सुधाकरराव पापडकर रा हातोला वय 65 यांना मृत घोषित केले. व सुधाकर ढळे वय 40 रा दिघी यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर केले. दोघांनी हेल्मेटचा वापर केला नव्हता. कृपया आपण सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा. कदाचित हेल्मेटचा वापर केला असता तर काही वेगळे चित्र असते. म्हणून हेल्मेटचा वापर हेल्मेट सक्तीचे कर करणे अतिशय महत्त्वाचे आहे असे त्यावेळी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी सांगितले. *नेहमी आपल्या सेवेत* *श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा व आस- आपत्कालीन पथक कारंजा*



