महाराष्ट्र

सोळंकी आत्महत्याप्रकरणी दोषींवर कारवाई करा एसएफआय विद्यार्थी संघटना आक्रमक ; स्वारातीम विद्यापीठात केली निदर्शने

*सोळंकी आत्महत्याप्रकरणी दोषींवर कारवाई करा एसएफआय विद्यार्थी संघटना आक्रमक ; स्वारातीम विद्यापीठात केली निदर्शने

*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसबुलढाणा प्रतिनिधी रामा इंदोरेआयआयटी मुंबई येथे शिक्षण घेणारा दर्शन सोळंकी याच्या आत्महत्येच्या निषेधार्थ स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) नांदेड विद्यापीठ कमिटी च्यावतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात निदर्शने करण्यात आली. यावेळी शैक्षणिक संस्थांमध्ये होत असलेले भेदाभेद तात्काळ थांबवावे यासाठी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर शनिवारी सकाळी ११ वाजता विद्यार्थी एकत्रित आले. देशातील विविध शैक्षणिक संस्था, विद्यापीठांमध्ये दलित, बहुजन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत आहेत. रोहित वेमुला, पायल तडवी, दर्शन सोळंकी हे विद्यार्थी संस्थात्मक जातीयवादाचे बळी ठरले असल्याचा आरोप करीत. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दर्शन सोळंकी हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कुलगुरू मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी एसएफआयचे माजी नेते काॅ.विजय गाबणे यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांनवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात विद्यार्थ्यांनी एकजूट होऊन लढले पाहिजे असे आवाहन केले.यावेळी विद्यापीठ कमिटीचे अध्यक्ष पवन जगडमवार , सचिव विशाल दावनगावे ,जय एंगडे ,अरूण कानवटे, अनिमेष बंडे ,विजयकुमार वाघमारे ,बाबासाहेब कांबळे, सुनिल तलवारे,महादेव वाघमारे , नकुल मेहता ,प्रशांत उडतेवार , घोगरे प्रताप, रितीक मेहता,शेख अब्दुलरहिम आदीजण उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button