महाराष्ट्रविदर्भ

महाशिवरात्री निमित्त श्री लिंगेश्वर मंदीर राम जन्मा आधीचे पुरातन स्थळ भाविकांची गर्दी.

महाशिवरात्री निमित्त श्री लिंगेश्वर मंदीर राम जन्मा आधीचे पुरातन स्थळ भाविकांची गर्दी.

..शेगांव-श्री लिंगेश्वर मंदीर राम जन्मा आधीचे पुरातन स्थळ. श्री लिंगेश्वर मंदिर हे पयोष्णी (पूर्णा) ची पांडव या संगमावर आहे. हे स्थळ जिल्हा बुलढाणा तालुका संग्रामपुर गाव भोन या गावच्या शिवारात आहे.पुरातन काळी शृंगेश्वर ऋषी यांनी पूर्णा नदीच्या तीरावर पूर्व वहिनी पवित्र स्थळ पाहून लिंगेश्वर महादेव मंदिराची स्थापना करून या पवित्र भूमीवरखूप तपश्चर्या व भक्ती साधना लिंगेश्वराची आराधना केली. या विषयीपायोष्णी महात्म या ग्रंथात अध्याय ३६ वा मध्ये वर्णन केलेले आहे. आत्ता आईक तीर्थ परम। ऋश्री शृंग अती उत्तम ।। ते तिथी पुण्य उत्तम | लोक तया प्रसिद्ध ।। असे हे तिन्ही लोकात प्रसिद्ध स्थळ आहे. तसेच ( रामायण या ग्रंथातराजा दशरथास मुल बाळ संतती न्हवती. त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला त्या पुत्र कामेष्टी यज्ञा चे यज्ञ करते पुरोहित ब्राम्हण जाणते पुरोहित श्री शृंगेश्वर ऋषी होते. पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यानंतर दशरथ राजास श्री राम, लक्ष्मण, भरत व छत्रगुन असे चार पुत्र झाले. त्या श्री शृंगेश्वर ऋषीनी न शिवारातील पूर्णा नदीच्या पूर्व वाहिनी तीरावर लिंगेश्वर मंदिरावर श्री शृंगेश्वर ऋषीनी खूप तपश्चर्या साधना केली म्हणून श्री लिंगेश्वर मंदिर हे राम जन्मा आधीचे पुरातन स्थळ आहे हे सिद्ध होते.या मंदिरात दर वर्षी महाशिरात्रीनिमित्त दर्शनासाठी दुरून दुरून भाविक दर्शनाला येतात.स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button