महाराष्ट्रविदर्भ

वणी वारुळा मुडगांव रस्त्यावर अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या ठेकेदारा विरुद्ध गुन्हे दाखल करा…

आकोट प्रतिनिधी

रिपाई आंबेडकर पार्टी अकोट तालुका कुशल भगत अकोट अकोट तालुक्यातील वणी वारुळा मुडगांव तेल्हारा रस्त्याचे काम सुरू आहे मात्र या रस्त्यावर गिट्टी मुरुमा ऐवजी नदी नाल्यातील काळी पिवळी माती टाकण्यात येत आहे. या बाबत ची तक्रार जिल्हाधिकारी ,अकोट उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, बांधकाम विभाग अकोला यांच्या कडे अकोट तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पार्टी च्या कार्यकर्त्यांनी सदर तक्रार पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाऊ निकाळजे,अकोला जिल्हा प्रभारी अध्यक्ष सचिन भाऊ कोकणे, जिल्हा कार्याध्यक्ष अजय प्रभे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आली आहे व तक्रारीत म्हटले आहे की संबंधित ठेकेदाराने नियमा पेक्षा जास्त प्रमाणात गौण खनिज उत्खनन करून चोरी केली आहे तेव्हा सदर कंपनी व ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी केली आहे. या माती बाबतीत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी नदी व नाल्यातील माती दोन मिटर खोल खोदण्यासाठी परवानगी दिली आहे मात्र सदर कंपनी ने व संबंधित ठेकेदाराने वणी वारुळा मुडगांव तेल्हारा रस्त्यावरील नदी व नाल्यातील काळी पिवळी माती १० मिटर पर्यंत खोदुन या रस्त्यावर गिट्टी,मुरुमा ऐवजी काळ्या पिवळ्या मातीच टाकण्यात येत आहे.या मार्गाचे काम सुधिर कन्स्ट्रक्शन ला देण्यात आले व या कंपनीने या मार्गावर गिट्टी मुरुमा ऐवजी काळ्या पिवळ्या मातीचा वापर केला जात आहे मात्र या कडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे तर नाल्या व नदीतील २मिटर पर्यंत गौण खनिज उत्खनन करण्यास जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आदेश दिले असतांना संबंधित ठेकेदाराने १० मिटर च्या वर खोदकाम करून गौण खनिज उत्खनन सुरू आहे या उत्खनना कडे अकोट चे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी दुर्लक्ष केले आहे विशेषतः शेतकऱ्यांना गौण खनिज उत्खनन करण्यासाठी परवानगी देण्यात येत नाही.व या वणी वारुळा मुडगांव पाथर्डी तेल्हारा रस्त्यावर गिट्टी मुरुमा ऐवजी उत्खनन केलेली काळी पिवळी माती टाकून रात्र दिवस काम सदर ठेकेदाराने सुरू केले आहे तेव्हा या रस्त्याच्या कामावर कोणत्याही अधिकाऱ्याचे लक्ष नाही.व ठेकेदाराने हम करोसो कायदा या युक्तिने कार्य सुरू केले आहे.तसेच जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी २मिटर पर्यंत नदीतील गाळ व गौण खनिज उत्खनन करण्याची परवानगी दिली आहे परंतु त्या परवानगी नुसार उत्खनन होत नसुन ते उत्खनन १०मिटर पर्यंत करण्यात येत आहे हे उत्खनन करताना यावर देखरेख ठेवण्यासाठी अकोट उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना उत्खनन बाबत आदेश निर्गमित करण्यात आला आहे परंतु ह्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली होत आहे तेव्हा या रस्त्याकडे व उत्खननाकडे जिल्हाधिकारी व वरिष्ठांनी लक्ष देवुन निकृष्ट दर्जाचे व अवैध गौण खनिज उत्खनन केलेल्या ठेकेदार व कंपनी वर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात यावे यावी अशी मागणी तक्रार व निवेदनाद्वारे अकोट तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पार्टी चे तालुकाध्यक्ष राजकुमार वानखडे, तालुका सचिव गणेश वाकोडे, तालुका उपाध्यक्ष सागर वडतकार शहराध्यक्ष सुरेंद्र मोरे महिला तालुकाध्यक्ष लक्ष्मीताई गांवडे, महिला तालुका सरचिटणीस सरीता ठाकुर, महिला तालुका उपाध्यक्ष अनुरिती गृहे, महिला तालुका सचिव मंगलाताई दिंडोकार सह कार्यकर्त्यांनी केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button