गण गण गणात बोते च्या गजरात निघाली झाडेगाव ते शेगाव पायदळ दिंडी

*गण गण गणात बोते च्या गजरात निघाली झाडेगाव ते शेगाव पायदळ दिंडी


श्री गजानन महाराज प्रगट दिन उत्सवानिमित्त श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनाकरिता झाडेगाव ते शेगाव पायदळ दिंडी निघाली असून यामध्ये 200 स्त्रियांनी सहभाग नोंदविला व 150 माणसे असे एकूण 350 जणांनी सहभाग नोंदविला. गण गण गणात बोते टाळ मृदुंग विना व अभंगांच्या गजरात संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेले होते. गावातील लहान मुलं पताका घेऊन श्री संत गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक झाले. गावात वारकरी संप्रदायाचा पाया जोपासला जावा व गावातील मुलांना सांप्रदायाची ओढ लागावी याकरिता लहान मुलांना दिंडीच्या सहवासात घेतले. झाडेगाव शेगाव पायदळ दिंडी वारीचे हे 26 व वर्ष आहे. स्त्रियांच्या डोक्यांवरील तुळसाबाई व कळस आणि दिंडीला शिस्त लावण्याकरिता चोपदार हे दृश्य पाहणाऱ्यांचे मन व लक्ष वेधून घेत होते. शेगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरा पर्यंत भाविकांनी पावल्या केल्या त्यामुळे दिंडी सर्वांचे लक्ष वेधून घेत हो ती प्रतिनिधी ज्ञानेश्वर रावणकार खामगाव



