बुलढाणामहाराष्ट्रराजकीयविदर्भ

मुंबई- मंत्रालयात आज मा. कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे सोबत वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी चर्चा करतांना राज्य संघटनेचे शिष्टमंडळ…

मुंबई- मंत्रालयात आज मा. कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे सोबत वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी चर्चा करतांना राज्य संघटनेचे शिष्टमंडळ…

शिष्टमंडळात ठाण्याचे आमदार, आमचे मार्गदर्शक संजयजी केळकर, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सुर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार, सल्लागार शिवगोंडा खोत, संजय पावसे, दत्ता घाडगे हे होते. यावेळी कामगार विभागाचे प्रधान सचिव, असंघटित कामगार आयुक्त, सहायक कामगार आयुक्त (असंघटित) आणि कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कल्याणकारी योजना, काॅर्नर स्टाॅल, सेंटर शेड या विषयावर मुख्यत्वे चर्चा झाली. लवकरच मालक लोकांची बैठक घेऊ असेही यावेळी कामगार मंत्र्यांनी सांगितले. इ श्रम कार्ड काढून असंघटित कामगार म्हणून राज्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी नोंदणी करावी यापुढे या नोंदणीकृत सदस्यांना वेगवेगळ्या योजना देण्याचे काम आम्ही करणार आहोत. सोबतच केंद्र सरकारच्या योजनांचा लाभही नोंदणीकृत सदस्यांना मिळणार आहेत असेही यावेळी कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button