शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व वंचित बहुजन आघाडीची युतीची घोषणा

*शिवसेना उद्धव बाळासाहेब* *ठाकरे व वंचित बहुजन* *आघाडीची युतीची घोषणा होताच*
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
शेगाव शहरात जल्लोष साजरा करण्यात आलामुंबई येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख एडवोकेट बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन शिवसेना वंचित बहुजन आघाडी युतीची घोषणा केली. या घोषणेचे शेगाव शहरात शिवसेनेचे तसेच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत करून एकमेकांना पेढे वाटले व प्रथम स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून जल्लोष साजरा केला याच प्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तेथे सुद्धा कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

या दोन्ही ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अविनाश दळवी, माजी नगरसेवक दिनेश शिंदे शहर प्रमुख योगेश पल्हाडे उपप्रमुख गजानन हाडोळे, यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच वंचित बहुजन आघातर्फे शेगाव शहराध्यक्ष प्रवीण बोदडे, नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष गजाननराव शेगोकार, वंचित बहुजन आघाडीचे मिलिंद शेगोकार भारिप बहुजन महासंघाचे युवक आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रभाकर पहुरकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते




