बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

सम्राट अशोक विजयादशमी निमित्त संग्रामपूर तालुक्यातील फोन येथे भव्य अभिवादन सभा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,

संग्रामपुर तालुका प्रतिनिधी,

रतन भगत.

संग्रामपूर दि.१७/१०/२६ सविस्तर वृत्त असे की, बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुका हा अत्यंत प्रशासकीय सर्वच दृष्टिकोनातून मागासलेला समजला जातो. परंतु आता सध्या बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याची ओळख ही संपूर्ण जगामध्ये पसरलेली आहे. याचे कारण म्हणजे संग्रामपूर तालुक्यातील भोन या गावी असलेला सम्राट अशोक कालीन प्राचीन बुद्ध स्तूप. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भोन या गावी सम्राट अशोककालीन प्राचीन बुद्ध स्तूप संशोधनांमध्ये सापडलेला आहे. हा स्तूप तथागत भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थिवर बांधण्यात आला होता. या ठिकाणी मौर्यकालीन प्राचीन अवशेष देखील मोठ्या प्रमाणात सापडलेले आहेत. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या ऐतिहासिक पवित्र स्थळास अभिवादन करण्यासाठी २० ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सम्राट अशोक विजयादशमी या ऐतिहासिक दिनानिमित्त भोन बुद्ध स्तूप बचाव संघर्ष कृती समिती व आझाद समाज पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने या अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन समाजभूषण गोल्डनमॅन डॉ. दिलीप खरात हे राहणार आहेत. तर प्रमुख मार्गदर्शक प्रसिद्ध इतिहासकार डॉ. विलास खरात राष्ट्रीय अध्यक्ष सनातन धर्म, प्रसिद्ध इतिहासकार डॉ. प्रताप चाटसे, डॉ. दीपक भाई केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅंथर सेना, सिद्धार्थ देवरे प्रदेश उपाध्यक्ष आ.स.पा. महाराष्ट्र, मनीष भाई साठे प्रदेश अध्यक्ष, आ.स.पा, प्रा. प्रमोद मेश्राम प्रदेश प्रवक्ता आ.स.पा., महाराष्ट्र, सामाजिक कार्यकर्ते कुणाल पडणकर हे राहणार उपस्थितआहेत. तसेच विविध सामाजिक धार्मिक व राजकीय पक्ष संघटनांचे मान्यवर या सभेला उपस्थित राहून संबोधित करणार आहेत. करिता संग्रामपूर तालुक्यातील तमाम बुद्ध उपासक उपासिका तथा बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या भव्य दिव्य असे अभिवादन सभेला उपस्थित राहावे असे आवाहन आजाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुजित बांगर यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button