शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून सन १९८३ मध्ये सुरू झालेली माँ वैष्णोदेवीची पवित्र ‘छडी यात्रा’ गेल्या ४४ वर्षांपासून अखंडपणे सुरू..

शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून सन १९८३ मध्ये सुरू झालेली माँ वैष्णोदेवीची पवित्र ‘छडी यात्रा’ गेल्या ४४ वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक सलोख्याची परंपरा जपणाऱ्या या यात्रेला यंदाही भक्तिभावाने सुरुवात झाली.
(जी.डी.रोकडे खामगाव प्रतिनिधी.)
शिवसेना पक्षाचे मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशानुसार यावर्षी या पवित्र यात्रेत शिवसेना पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नामदार मा.प्रतापरावजी जाधव साहेब सहकुटुंब सहभागी झाले.
जम्मू येथील ऐतिहासिक श्री रघुनाथ मंदिरातून जम्मू-काश्मीर शिवसेनेच्या वतीने पवित्र छडी आणि अखंड ज्योत घेऊन निघालेल्या यात्रेचे कटरा मार्गे माँ वैष्णोदेवीच्या मुख्य भवनापर्यंत आगमन झाले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांचे भक्तिभावाने स्वागत केले.
माँ वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन विधिवत पूजा-अर्चना केली, तसेच घटस्थापनेच्या शुभप्रसंगी आयोजित विशेष महाआरती केली आणि पवित्र छडीचे पूजन केले. देशात सुख, शांती, समृद्धी आणि बंधुभाव कायम राहावा, तसेच शेतकरी बांधवांसह समस्त देशवासीयांचे जीवन सुखी, समृद्ध आणि संकटमुक्त व्हावे, यासाठी माँ वैष्णोदेवीच्या चरणी प्रार्थना केली…..



