खानदेशबुलढाणामहाराष्ट्र

भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी शुभम जायभाये यांची निवड

विदर्भातून प्रदेश कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी; संघटनात्मक अनुभवाचा पक्षाला होणार उपयोग

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा मुंबई येथील युवा मोर्चा प्रभारी सुनिल राणे व युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीक यांनी केली. या प्रदेश कार्यकारिणीत देऊळगाव राजा येथील इंजि. शुभम सुधाकर जायभाये यांची भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. विदर्भातून प्रदेश पातळीवर त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

शुभम जायभाये यांनी यापूर्वी भाजपा अभियंता सेल, महाराष्ट्र प्रदेश संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक काम करत अभियंता वर्गाशी संपर्क वाढविणे, संघटन मजबूत करणे आणि पक्षाच्या विविध उपक्रमांना व्यापक स्वरूप देण्यासाठी योगदान दिले.

प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शुभम जायभाये यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, कामगार मंत्री आकाश फुंडकर,
युवा मोर्चा प्रभारी सुनील राणे, भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय कुटे, आ.श्वेता महाले,विदर्भ संयोजक दिनेश सूर्यवंशी,युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडीकयांचे विशेष आभार मानले.

यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना शुभम जायभाये म्हणाले, “पक्षाने माझ्यावर सोपविलेली ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शेवटच्या युवकाशी संपर्क साधण्याच्या संकल्पनेनुसार राज्यातील प्रत्येक युवकापर्यंत पोहोचण्यासाठी सातत्याने काम करणार आहे. युवकांना संघटनेशी जोडण्यासोबतच त्यांच्या प्रश्नांना व अपेक्षांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.”

शुभम जायभाये यांच्या निवडीबद्दल देऊळगाव राजा, बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button