खानदेशगुन्हेगारीजळगावा जिल्हाजळगावा जिल्हामहाराष्ट्ररावेर

निंभोरा पोलिसांची मोठी कारवाई; ५.४२ लाखांचा गुटखा-पानमसाला जप्त

वडगाव फाट्याजवळ कारवाई; दोघांना अटक, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जळगाव जिल्हा प्रतिनिधी : विनोद तायडे

रावेर : निंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वडगाव फाट्याजवळ पोलिसांनी मोठी कारवाई करत सुगंधित पानमसाला, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा सुमारे ५ लाख ४२ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी क्रमांक १ व २ यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे

हि घटना ७ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ५.४५ वाजता वडगाव फाट्याजवळ, ता. रावेर, जि. जळगाव येथे घडली. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी योगराज किशोर सूर्यवंशी, अन्न सुरक्षा अधिकारी, जळगाव यांनी फिर्याद दिली आहे.

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणात आझिम तैय्यब सय्यद (वय २३), शेख मुबश्शीर कासिम (वय २३) तसेच मध्य प्रदेशातील नितू शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी क्रमांक १ व २ यांना अटक करण्यात आली आहे.

जप्त मुद्देमाल

पोलिसांनी केलेल्या कारवाईत राजनिगंधा सुगंधित पानमसाला, राजनिगंधा सुगंधित पानमसाला विल्सेल, प्रीमियम शॉट लवंगरी च्युइंग तंबाखू, डायरेक्टर स्पेशल पानमसाला गुटखा, पान पराग पानमसाला, RMD गुटखा आणि XP 20 च्युइंग तंबाखू असा विविध मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ५ लाख ४२ हजार ५२० रुपये असल्याची नोंद आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, २२३, २७४, २७५ व ३(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे. पुढील तपास निंभोरा पोलिसांकडून सुरू आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button