संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील ३५ वर्षीय युवकाचा दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मृत्यू

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी,
रतन भगत,
संग्रामपूर, (पातुर्डा) दि.८/१०/२६ सविस्तर वृत्त असे की संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील अंदाजे ३५ वर्षीय युवकाचा पातुर्डा फाटा येथून पातोळ्याकडे दुचाकी घेऊन जात असताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना दि७/१०/२६ रोजी सायंकाळी अंदाजे सात वाजताच्या सुमारास घडली. मृतक युवकाचे नाव कैलास महादेव उगले असे आहे. याबाबत थोडक्यात मिळालेल्या माहितीनुसार संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील कैलास उगले त्यांच्या गावातील नातेवाईकांसह पाचोरा फाट्यावरून पातुरड्या गावाकडे दुचाकीने येत असताना पातुर्डा येथील खडीच्या नाल्याजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात कैलास उगले सडक वर जोरात पडला. या दरम्यान त्यांच्या डोक्याला गंभीर अशा प्रकारची दुखापत होऊन रक्त मोठ्या प्रमाणात वाहिले. गंभीर अशा अवस्थेमध्ये रुग्णाला रुग्णवाहिकेतून सईबाई मोठे सामान्य रुग्णालय शेगाव येथे हलविण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून संबंधित अपघातग्रस्त कैलास उगले यास मृत घोषित केले. सदर दूध देवी घटनेत मृतक कैलास उगले यांच्या कुटुंबीयावर फार मोठा दुःखाचा डोंगर पसरलेला आहे. कारण कैलास उगले हे त्यांच्या कुटुंबामध्ये एकटेच कमावते होते. त्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाचा बोजा होता. ते असे अचानक निघून गेल्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले. मृतकाच्या पश्चात त्यांची वृद्ध आई, पत्नी, आणि एक चार वर्षाची चिमुकली असा त्यांचा आप्तपरिवार आहे.



