बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

कर्जाला कंटाळून चोंडी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या; तामगाव पोलीस गुन्हा दाखल.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे.
दि.६/१०/२०२६.

संग्रामपूर तालुक्यातील चोंडी येथे एक धक्कादायक आणि हृदय द्रावक घटना समोर आली आहे.
शेतीवरील कर्ज आणि सततच्या नापिकीला कंटाळून चोंडी येथील एका 41 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्यांने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली.
शंकर रामभाऊ भारसाकळे वय 41 वर्ष असे मृत शेतकरी बांधवांचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शंकर भारसाकळे हे अल्पभूधारक शेतकरी होते, त्यांच्यावर बँकेचे व इतर खाजगीकरण होते. कर्जबाजारीपणा ते गेल्या काही दिवसापासून प्रचंड मानसिक तणावाखाली होते. याच विवंचनेतून त्यांनी दोन ऑक्टोंबर 2026 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरातील स्वयंपाक खोलीत छताच्या लोखंडी हूकाला दोरीच्या साह्याने गळफास लावून आपले जीवन संपवले. ही घटना तीन आक्टोंबर रोजी सकाळी उघडीस आली.
या प्रकारची माहिती मिळताच तामगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतकाचे भाऊ गोपाल रामभाऊ भारसाकडे (या. चोंडी.ह.मु. जळगाव जामोद) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तामगाव पोलिसांनी कलम १९४.BNSS (भारतीय नागरिक सुरक्षा सहित) अन्वये आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश मोरे करत आहे.

शासकीय मदतीची मागणी
मृत शंकर भारसाकडे हे आपल्या कुटुंबातील एकमेव कमावते पुरुष होते. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांचे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आले आहे. अत्यंत गरिबीत दिवस काढणाऱ्या या कुटुंबाला शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी जुनी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे…..✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button