खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर प्रकाश धनवटे एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध… ठाणेदार भूषण गावंडे यांचे नेतृत्वात मोठी कारवाई

आवाज न्यायाचा
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
चिखली. ता.प्रतिनिधी

चिखली शहरातील ईश्वर धनवटे याच्याविरुद्ध यापूर्वी मारामारी, चोरी, जबरी चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीररित्या बंदूक बाळगणे यांसह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व त्याच्या कृत्यांमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याचा विचार करून चिखली शहर व परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठाणेदार भूषण गावंडे यांनी ईश्वर प्रकाश धनवटे याच्याविरुद्ध MPDA Act 1981अन्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात यावे यासाठी स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून मा. जिल्हा दांडाधिकारी यांचेकडे सादर केला होता.

सदर प्रस्तावाची सक्षम प्राधिकाऱ्यांकडून पडताळणी करण्यात आल्यानंतर मा. जिल्हा दंडाधिकारी, बुलढाणा यांनी प्रस्तावास मंजुरी देऊन ईश्वर प्रकाश धनवटे यास एक वर्षाच्या कालावधीसाठी कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले आहेत. सदर आदेशाची अंमलबजावणी बुलडाणा जिल्हा कारागृह येथे करण्यात आली आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, मा. अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस स्टेशन चिखलीचे पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या नेतृत्वात PSI शरद भागवतकर, पोलीस अंमलदार विजय किटे, अमोल गवई, अजय इटावा, प्रशांत धंदर, राहुल पायघन, निलेश सावळे, ज्ञानेश्वर शिंदे, ललिता खरात, रुपाली उगले यांनी केली आहे.

सन 2026 मध्ये
चिखली पोलीस स्टेशनकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कलम 56,57 महा. पोलीस कायदा अंतर्गत 16 इसमांना तडीपार करण्यात आले आहे व यापुढेही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमावर सातत्याने कारवाई करण्यात येणार आहे.✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button