खानदेशबुलढाणामहाराष्ट्र

विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ ; मतदार नोंदणीसाठी ३, ४, १० व ११ ऑक्टोबर रोजी विशेष शिबिरे

नाव नोंदणी व दुरुस्तीसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

बुलढाणा, दि. २ : विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ अंतर्गत मतदार यादीत नाव नोंदणी, नावाची पडताळणी तसेच मतदार यादीतील तपशिलांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ज्या पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीत अद्याप समाविष्ट झालेले नाही, अशा नागरिकांसाठी त्यांच्या संबंधित मतदान केंद्रांवर ३, ४, १० व ११ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १२ ऑक्टोबर २०२६ आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी निर्धारित मुदतीत नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.

या विशेष शिबिरांमध्ये १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना नमुना क्र. ६ अर्जाद्वारे मतदार यादीत नाव नोंदणी करता येणार आहे. तसेच नागरिकांना मतदार यादीतील आपले नाव तपासता येणार असून, नाव, पत्ता किंवा इतर तपशिलांमध्ये आवश्यक दुरुस्ती असल्यास संबंधित अर्ज सादर करता येतील. निवडणूक प्रशासनाकडून नोटीस प्राप्त झालेल्या व्यक्तींनाही आवश्यक पुरावे व कागदपत्रे सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मतदार नोंदणीसाठी नागरिकांना voters.eci.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून तसेच ECINET मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन अर्ज करता येईल. तसेच संबंधित मतदान केंद्र किंवा मतदार नोंदणी अधिकारी (ERO) कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज सादर करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

पात्र नागरिकांनी विशेष शिबिरांचा लाभ घेऊन मतदार यादीतील आपली नोंदणी तपासावी व आवश्यक असल्यास नाव नोंदणी अथवा दुरुस्तीची कार्यवाही १२ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी १८०० २२ १९५० या मतदार मदत क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक प्रशासनाने केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button