सत्य, अहिंसा आणि मानवतेच्या विचारांनी समृद्ध समाज घडविणे, हीच महात्मा गांधीजींना खरी आदरांजली …. मा. आमदार राणा दिलीपकुमार सानंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त अभिवादन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी: गजानन तांगडे, खामगांव
खामगाव :- दि.०२ ऑक्टोंबर २०२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर पोलीस स्टेशनसमोरील गांधी उद्यानामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व
भारताचे माजी पंतप्रधान स्व. लाल बहादुर शास्त्री यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बोलतांना मा. आमदार राणा दिलीपकमार सानंदा म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला सत्य, अहिंसा आणि नैतिकतेची दिशा देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी देशभरात साजरी केली जाते. केवळ भारताच्या इतिहासातच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या इतिहासात सत्य आणि अहिंसेच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणणारे महान व्यक्तिमत्त्व म्हणून महात्मा गांधी यांचे नाव आदराने घेतले जाते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी शांती आणि अंहिसेच्या मार्गाने स्वातंत्र्य लढा उभारुन भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याचप्रमाणे भारत देशाचे दुसरे पंतप्रधान स्व. लाल बहादुर शास्त्री यांनी सुध्दा जय जवान जय किसान चा नारा देवुन विकसनशील भारत देश घडविण्यासाठी महान कार्य केले. या दोन्ही महान नेत्यांचे विचार आणि त्यांची जिवनशैली आजही जगाला प्रेरणा देत आहे. गांधी जयंतीदिनी सत्य, अहिंसा आणि मानवतेच्या विचारांनी समृध्द समाज घडविणे हीच महात्मा गांधीजींना खरी आदरांजली ठरेल असे त्यांनी केले. प्रारंभी मा. आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार तसेच लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही जयंतीनिमित्त थोर महापुरुषांच्या स्मृतींना पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी की जय, अमर रहे अमर रहे महात्मा गांधी अमर रहे, लाल बहादुर शास्त्री की जय, जय जवान जय किसान, हम सब एक है, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो अश्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खामगाव शहर अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, उपाध्यक्ष नरहरी टिकार गुरुजी, महिला शहर अध्यक्षा शारदाताई शर्मा, डॉ. आर. के. राजपुत, नगरसेवक तहेसीन शाह, शेगाव पंचायत समितीचे माजी सभापती विजय काटोले, संजुभाऊ शर्मा, शिवाजीराव पांढरे, सत्तु शर्मा, गजानन जाधव, पुरुषोत्तम शेजोळे, अन्सार भाई, प्रमोद महाजन, निलेश तासतोडे, कडुबा पांढरे, अवधुत टिकार, एजाज देशमुख, जुबेर शाह, दुर्गासिंग ठाकुर, सैय्यद फारुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



