खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

सोनवद येथे मण्यार बिरादरीतील मूकबधिर मुला-मुलीचा आदर्श विवाह संपन्न

मुलगी पाहण्यासाठी आले अन् साखरपुडा न करताच थेट विवाह लावून परतले

सोनवद बुद्रुक (ता. धरणगाव) : सामाजिक बांधिलकी, आपुलकी, समजूतदारपणा आणि साधेपणाचा सुंदर संदेश देणारा मण्यार बिरादरीतील मूकबधिर मुला-मुलीचा आदर्श विवाह सोनवद बुद्रुक येथे उत्साहात व साधेपणाने संपन्न झाला.सोनवद बुद्रुक येथील रहिवासी तसेच हकीम चौधरी यांचे लहान बंधू शेख रहीम शेख रशीद चौधरी यांची द्वितीय कन्या रोजमीन बी. ही मूकबधिर आहे. तर हिंगोणा, ता. यावल येथील रहिवासी शेख मेहमूद यांचे चिरंजीव वसीम हे देखील मूकबधिर आहेत.वधू रोजमीन बी. हिच्याबाबतची माहिती मो. रफीक सैय्यद सैय्यद सुपडू जळगाव यांनी वरपक्षातील मंडळींना दिली. त्यानंतर नवरदेव वसीम यांच्यासह वरपक्षातील मंडळी मुलगी पाहण्यासाठी सोनवद येथे आले. मुलगा व मुलगी यांनी एकमेकांना पसंती दिल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये चर्चा करण्यात आली.विशेष म्हणजे, साखरपुड्याची औपचारिकता न करता जळगांव जिल्हा मणियार बिरादरी चे जिल्हा उपाध्यक्ष हकीम आर चौधरी मुक्ताईनगर यांनी दोन्ही कुटुंबांच्या मंडळीला समजून सांगितले व दोघांची संमतीने त्याच वेळी विवाह लावून देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि विवाह संपन्न करून वरपक्षातील मंडळी परतली. साधेपणाने झालेला हा विवाह परिसरात चर्चेचा विषय ठरला.या विवाहासाठी मुक्ताईनगर चे अहमद ठेकेदार,सोनवद येथील उमर खाटिक, जाकीर पिंजारी, सामाजिक कार्यकर्ते गनी पिंजारी, शेख असलम खाटिक, सत्तार मामू, सलीम अमीर, शाकीर मणियार,शब्बीर मण्यार, नाजीम मण्यार, मुस्तकीम मण्यार,मोहसीन अडावद, अनिस ठेकदार बोदवड,रहीम चौधरी यांचे मोठे जावई शेख शरीफ (फोपनार), शब्बीर हवालदार, राजू पिंजारी आदींनी उपस्थित राहून सहकार्य केले.तर नवरदेवाकडील मंडळींमध्ये शेख लतीफ (हिंगोणा), मोहम्मद हनीफ (जळगाव), अजीज मणियार तसेच मुलाकडील जबाबदार सामाजिक कार्यकर्ते शरीफ शेख, शेख अब्दुल आदींची उपस्थिती होती.या विवाहाच्या जुळवाजुळव व मध्यस्थीमध्ये जळगाव येथील मोहम्मद रफीक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच या संपूर्ण उपक्रमाच्या नियोजनासाठी रेहान चौधरी, आसिफ चौधरी व जुनेद चौधरी यांनी विशेष प्रयत्न केले.
या सर्वांच्या सहकार्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये संवाद व समन्वय साधला गेला आणि मूकबधिर वसीम व रोजमीन बी. यांचा विवाह आनंदाच्या वातावरणात पार पडला.मुलगी पाहण्यासाठी आले, दोघांनी एकमेकांना पसंती दिली आणि साखरपुडा न करता थेट विवाह लावून देण्यात आला, ही या विवाहाची विशेष बाब ठरली. या विवाहातून साधेपणा, परस्पर विश्वास, कुटुंबीयांची संमती आणि सामाजिक बांधिलकीचा सकारात्मक संदेश समाजासमोर आला.विवाह सोहळ्यास उपस्थित सर्व मान्यवर, नातेवाईक व समाजबांधवांनी नवदाम्पत्यास शुभेच्छा देत त्यांच्या भावी वैवाहिक जीवनासाठी मंगलकामना केल्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button