बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

बसस्टँड चौकातील गणेश मंडळाला पोलिस अधिकाऱ्यांची भेट

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा, दि. २२ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना पोलिस प्रशासनाकडून भेटी देऊन उत्सव शांततेत व सुरक्षित वातावरणात साजरा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने बसस्टँड चौक येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गणेश मंडळाला पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली.

अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे आणि पोलिस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी मंडळाला भेट देऊन पदाधिकारी व सदस्यांशी संवाद साधला. यावेळी मंडळाच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांचा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे आणि पोलिस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य तसेच पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, याची सर्व गणेश मंडळांनी काळजी घ्यावी. उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. तसेच गणेशोत्सवाच्या माध्यमातून बंधुभाव आणि सामाजिक सलोखा कायम राहील, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असे मार्गदर्शन पोलिस अधिकाऱ्यांनी केले.

मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत साजरा करण्याची ग्वाही दिली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button