शिंदखेड्यात श्री मोरया गणेश मित्र मंडळातर्फे रविभाऊ पाटील यांचा सत्कार

गणरायाची विधिवत आरती; सामाजिक कार्याची दखल घेत मंडळातर्फे गौरव
शिंदखेडा ता रावेर
जळगाव जिल्हा प्रतिनिधी
विनोद तायडे
शिंदखेडा येथील श्री मोरया गणेश मित्र मंडळ (पाटील वाड्याचा राजा) यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात रावेर येथील गोरक्षक व समाजसेवक रविभाऊ पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी श्री गणरायाची विधिवत आरती करून धार्मिक वातावरणात कार्यक्रम पार पडला.
समाजातील विविध घटकांना मदत करणे, गरजूंच्या सुख-दुःखात सहभागी होणे तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान देणे, या कार्याची दखल घेत मंडळाच्या वतीने रविभाऊ पाटील यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले.
यावेळी मंडळाच्या वतीने रविभाऊ पाटील यांच्या हस्ते श्री बाप्पाची आरती करण्यात आली. आरतीनंतर मंडळाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला मंडळाचे कार्यकर्ते, महिला मंडळातील सदस्य तसेच गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक कार्यक्रमासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी रविभाऊ पाटील यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी श्री विठ्ठल महाराज यांनी रविभाऊ पाटील यांचे आभार मानले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमामुळे शिंदखेडा परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. सामाजिक कार्याचा सन्मान करण्याची मंडळाची परंपरा आणि उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.



