बुलढाणामहाराष्ट्र

बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; देऊळगाव राजा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा:सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात यावर्षी अत्यंत कमी आणि अनियमित पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यात गंभीर कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकरी व नागरिकांना तातडीने दुष्काळी मदत देण्यात यावी, या मागणीचे निवेदन आज देऊळगाव राजाचे तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि बुलढाण्याचे पालकमंत्री यांना पाठवण्यात आले.

यावर्षी पावसाने दगा दिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पिके करपून गेल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे संकटात सापडला आहे. केवळ शेतीच नव्हे, तर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चार्‍याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे.

या पार्श्वभूमीवर, शासनाने तात्काळ परिस्थितीची दखल घेऊन संपूर्ण बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी तीव्र मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन देताना उपस्थित आकाश कासारे, अकीब कोटकर, यश कासारे, दिपक जाधव, राजु कोकाटे, सुमित कासारे, नितीन पिंपळे, प्रकाश बसी, अमित राऊत, विशाल गुप्ता, नासेर शाह, उस्मान शाह, विनोद शिराळे यांच्यासह स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांच्या सह्यांनी देण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button