जिजामाता नगरमध्ये मोफत नेत्रतपासणी शिबिर

१५७ रुग्णांची तपासणी; ४१ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
सिंदखेडराजा, दि. २३ : गणपती उत्सवानिमित्त जिजामाता नगर येथे मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू निदान शिबिर घेण्यात आले. नगरसेवक गौतम खरात यांच्या आयोजनातून झालेल्या या शिबिरात श्री. गणपती नेत्रालय, जालना येथील वैद्यकीय पथकाने नागरिकांची नेत्रतपासणी केली.
शिबिरात १५७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४१ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड झाली. निवड झालेल्या रुग्णांवर जालना येथील श्री. गणपती नेत्रालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच २० रुग्णांना चष्मे देण्यात येणार आहेत.
तपासणीदरम्यान डॉक्टरांनी रुग्णांना डोळ्यांची निगा आणि आवश्यक उपचारांबाबत मार्गदर्शन केले. गणपती उत्सवानिमित्त झालेल्या या शिबिरातून गरजू रुग्णांना नेत्रतपासणी व पुढील उपचारासाठी सुविधा मिळाली.



