खानदेशबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

वरवट बकाल येथील कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभागृहांमध्ये २२ ऑक्टोबर २०२६ रोजी ची धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,

संग्रामपुर तालुका प्रतिनिधी,

रतन भगत.

संग्रामपूर वरवट ( बकाल) दि.२३/९/२६ सविस्तर वृत्त असे की अखिल भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी संग्रामपूर तालुक्याच्या वतीने दिनांक २२/९/२६ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वरवट बकाल येथे होऊ घातलेल्या २२ ऑक्टोबर २०२६ रोजी धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या उचित्य साधून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य अशा सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यासाठी भारतीय बौद्ध महासभा आणि संग्रामपूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त विद्यमाने वरुड बघाल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा आणि तालुका आजी-माजी पदाधिकारी तसेच वंचित बहुजन आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे बैठकीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय किशोर भाऊ भिडे वंचित बहुजन आघाडी संग्रामपुर तालुका अध्यक्ष तसेच भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार सचिव आदरणीय गोदाचार्य मिलिंद भाऊ वानखडे साहेब, भाऊराव गव्हांदे साहेब तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा संग्रामपूर, तसेच वंचित बहुजन आघाडी संग्रामपूर तालुका महासचिव नंदकिशोर भाऊ पुंडे साहेब, शंकर ससाने साहेब, अशा बऱ्याच कार्यकर्त्यांनी उपस्थित जनसमुदायाला २२ ऑक्टोबर २०२६ गुरुजी होऊ घातलेल्या कार्यक्रमाबद्दल उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंतराव वानखडे साहेब यांनी केले तर प्रास्ताविक पर भाषण बोदाचार्य निलेश लासे साहेब यांनी केले. तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रतन भगत यांनी केले. सदर आढावा बैठक यशस्वी होण्यासाठी सहकार्याने अतोनात मेहनत घेतली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button