मुंबई येथील संविधान सन्मान सभेनिमित्त विशाखाताई यांचा जिल्ह्यामध्ये झंझावती दौरा

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे )
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी 25 नोव्हेंबर 2023 रोजी छत्रपती शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संविधान सन्मान महासभेचे आयोजन केले आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून लाखो संविधान प्रेमी मुंबई येथे सहभागी होणार आहेत सदर संविधान सभे दादर मुंबई येथील रॅलीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील हजारो लोक सहभागी व्हावेत यासाठी विशाखाताई सावंग जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन महिला आघाडी यांनीही मनोदय व्यक्त करून खामगाव तालुक्यात दोन दिवसापासून सकाळी दहा वाजता पासून रात्री अकरा वाजेपर्यंत झंझावती दौरा करून बहुतांश गावात संविधान सन्मान महासभा मुंबईला जाण्याकरिता जनजागृती केली यामध्ये महिला सह पुरुषांनाही गावागावात एकत्र करून बैठका आयोजित करून त्यांना संविधान महासभेत सहभागी होण्यासाठी संविधानाचे महत्त्व व संविधानावर होणारे आघात यावर सविस्तरपणे विवेचन करून लोकांना आवाहन करण्यात आले आहे सदामर दौऱ्यामध्ये त्यांच्यासोबत आयु धम्मपाल गवई यांनीही दौऱ्यात त्यांच्यासोबत राहून लोकांना जागृत करण्यासाठी योगदान दिले आहे दिनांक 20/11/23 ते 22/11/23 पर्यंत खामगाव मधील विविध गावात स्वतः जाऊन त्यांनी भेटी दिल्या व महिला पुरुषांना मुंबईला संविधान सन्मान महा रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी लोकांची त्यांनी जनजागृती केली खामगाव मधील आवार, विहिगाव ,अटाळी, बोरी, आडगाव, गारडगाव, अंत्रज, किन्ही महादेव, जळका तेली ,जनुना यांच्यासह अनेक गावात झंजावती दौरा करून लोकांना जागृत करण्यात आले पुढील उर्वरित दिवसांमध्ये म्हणजेच दिनांक 23 11 23 ते 24 11 23 पर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील इतरही तालुक्यात विशाखाताई सावंग यांचा दौरा नियोजित आहे शेगाव, संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर,जळगाव जामोद येथील गावातही जाऊन त्या लोकांच्या भेटीगाठी घेण्याचे त्यांनी नियोजन केलेले आहे व सर्व तालुक्यातील सर्व तालुका अध्यक्ष व त्यांचे कार्यकारणी यांना सुद्धा प्रत्येक गावामध्ये जाऊन मुंबईला येण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करावे असे आवाहन केले आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये बुलढाणा जिल्ह्यामधून हजारो नागरिक मुंबई येथील संविधान सन्मान महासभेकरता गेले पाहिजेत असा त्यांनी या झंजावाती दौऱ्यानिमित्त निश्चय केला आहे



