बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेतातील मोटार सुरू करण्यावरून भावांमध्ये वाद; तिघांविरुद्ध गुन्हा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा, दि. २२ : शेतातील सामाईक मोटार पंप सुरू करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून शेतकऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २० सप्टेंबर रोजी सकाळी आळंद शिवारातील गट क्रमांक ३१ मधील शेतात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडू श्रीराम भुतेकर (वय ४५, रा. आळंद, ता. देऊळगाव राजा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या शेतालगत त्यांचा भाऊ सतीश श्रीराम भुतेकर यांची शेती आहे. धरणावरून दोन्ही शेतांसाठी पाईपलाइन करण्यात आली असून, त्यासाठी सामाईक मोटार पंप बसविण्यात आला आहे.

२० सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास खंडू भुतेकर हे मोटार सुरू करण्यासाठी शेतात गेले असता तेथे सतीश भुतेकर, सोहम सतीश भुतेकर आणि विद्या सतीश भुतेकर उपस्थित होते. मोटार का सुरू केली, असा जाब विचारल्यानंतर वाद झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर सतीश यांनी गळा पकडून मारहाण केली, सोहम यांनी काठीने कंबरेवर, हातावर व डोक्यावर मारहाण केली, तर विद्या यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, विकास वसंत सरोदे व मथुरा दत्तू भुतेकर यांनी घटनास्थळी येऊन भांडण सोडविल्याचे फिर्यादीत नमूद आहे. जखमी खंडू भुतेकर यांच्यावर उपचार करण्यात आले असून, पुढील उपचारासाठी त्यांना जालना येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. उपचारानंतर घरी परतल्यानंतर त्यांनी २२ सप्टेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी सतीश श्रीराम भुतेकर, सोहम सतीश भुतेकर आणि विद्या सतीश भुतेकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मा संतराम गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button