खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

शॉर्टसर्किटमुळे मुक्ताईनगरच्या जुन्या गावात भीषण आग; संसारोपयोगी साहित्य व शैक्षणिक कागदपत्रे जळून खाक

शॉर्टसर्किटमुळे मुक्ताईनगरच्या जुन्या गावात घराला भीषण आग; संसारोपयोगी साहित्य जळून खाक

मुक्ताईनगर प्रतिनिधी :

मुक्ताईनगर शहरातील जुना गाव परिसरात शॉर्टसर्किटमुळे एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, कपडे, अंथरूण तसेच शैक्षणिक साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.जुना गाव परिसरातील प्रभाग क्रमांक ३ मधील रहिवासी निलेश सिताराम मिस्त्री यांच्या घरात ही आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने घरातील अनेक वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.या आगीत मिस्त्री यांच्या मुलीचे शैक्षणिक साहित्य, पुस्तके तसेच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. यामध्ये गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला (एलसी) यांचाही समावेश असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. घरातील झोपण्यासाठी वापरण्यात येणारे अंथरूण आणि इतर संसारोपयोगी साहित्यदेखील आगीत नष्ट झाले.निलेश सिताराम मिस्त्री हे मिस्त्री काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आगीमुळे त्यांच्या कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, स्थानिक लोकप्रतिनिधींनी या घटनेची दखल घेऊन नुकसानग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या संबंधित यंत्रणेकडून पाहणी व पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. नुकसानाचे योग्य मूल्यांकन करून पुढील मदतीसाठी कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.आगीची माहिती मिळताच नगरसेवक गणेश टोंगे यांनी घटनास्थळी सक्रिय सहभाग घेत संबंधित यंत्रणेशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. तसेच अग्निशामक दलाची गाडी बोलावण्यात आली. मात्र, अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले.या घटनेमुळे गरीब कुटुंबाच्या संसारावर संकट कोसळले असून, प्रशासनाने नुकसानग्रस्त कुटुंबाच्या नुकसानीची तातडीने पाहणी करून शासनाच्या नियमानुसार मदत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button