बुद्धत्व मित्र मंडळ, बुद्ध पुत्र महिला संघ अवार तालुका संग्रामपूर येथे भारतीय बौद्ध महासभा तसेच वंचित तालुकाध्यक्ष संग्रामपूर यांची प्रवचन मालिकेला भेट!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी,
रतन भगत.
संग्रामपूर (आवार) दि२०/ ९/२६ सविस्तर वृत्त असे की काल दिनांक २०/९/२६ रोजी भारतीय बौद्ध महासभा संग्रामपूर जिल्हा बुलढाणा उत्तर विभाग आवार या ठिकाणी बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन पठण म्हणून चिंतन चालू आहे. त्यानिमित्ताने आज रोजी प्रवचन मालिका ठरल्यानुसार आवार येथे विषयाला अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी बोधाचार्य भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संस्कार सचिव आयुष्यमान मिलिंद भाऊ वानखडे, तसेच संग्रामपुर तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी किशोर भाऊ भिडे, महासचिव दीपक भाऊ पहुरकार तसेच यशवंतराव वानखडे साहेब तालुका सचिव हे प्रामुख्याने हजार होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. आणि नंतर त्रिशरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रस्ताविक दीपक भाऊ पहुरकर यांनी केले. तसेच मिलिंद भाऊ वानखडे , किशोर भाऊ भिडे तालुकाध्यक्ष वंचित संग्रामपूर तालुका, यशवंतराव वानखडे साहेब तालुका सचिव यांनी सुद्धा उपस्थित जनसमुदायाला महाबोधी महा विहाराचा इतिहास या विषयावर आधारित खूप सोप्या भाषेत योग्य मार्गदर्शन केले. या वर्षावासाच्या निमित्ताने सुरू असलेल्या बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथ वाचनाच्या वेळी संपूर्ण समाजातील लोकांनी महिलांनी आणि लहान मुलांनी या ग्रंथाचे वाचन पठण आणि म्हणून करण्यासाठी प्रत्येक गावातील बौद्ध उपासक उपाशी का यांनी वेळात वेळ काढून उपस्थित रहावे अशा प्रकारचे मार्गदर्शन केले. आणि जे आज पासून विहारांमध्ये नेहमी म्हणजे शेवटच्या तारखेपर्यंत या ग्रंथाच्या वाचनाला आणि श्रवणाला हजर राहतील अशा बौद्धउपासक उपाशीकांना पांढरे शुभ्र वस्त्र बक्षीस देण्याचे शब्द देऊन आपले मनोगत थांबवत सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच वंचित बहुजन आघाडी तालुका महासचिव आयोग दीपक भाऊ पहुरकर यांनी प्रवचन मालिका का व कशासाठी आयोजन करण्यात येते याची रीतसर माहिती उपस्थिती त्यांना देऊन त्यांच्या प्रतिमांगल कामना व्यक्त केली तसेच वंचित बहुजन आघाडी तालुका सचिव यशवंतराव वानखडे यांनी वर्षावास बद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष्यमान अनिल बोदडे यांनी केले. तर या प्रवचन मालिकेच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आयु सिद्धार्थ बोदळे, आयु बाळू भाऊ बोदळे, बुद्धत्व मित्र मंडळ सर्व पदाधिकारी, बुद्ध पुत्र महिला संघ च्या सर्व पदाधिकारी समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रम अत्यंत शांततेत पार पडला.



