सिनगाव जहागीर येथे सामाजिक एकतेचा संदेश; छत्रपती नगरच्या राजाची मुस्लिम बांधवांच्या हस्ते महाआरती!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगावराजा :तालुक्यातील सिनगाव जहागीर येथे आज सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे एक आदर्श दर्शन पाहायला मिळाले. येथील छत्रपती नगरचा राजा गणेश मित्र मंडळाने मुस्लिम समाजातील बांधवांना गणपती बाप्पाच्या आरतीचा मान देऊन समाजात एकतेचा सुंदर संदेश दिला आहे.
“धर्म वेगळे असले तरी माणुसकी आणि बंधुभाव सर्वांत मोठा असतो,” हा विचार कृतीत आणत या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आरतीच्या वेळी परिसरातील वातावरण ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने आणि बंधुभावाच्या भावनेने भारावून गेले होते.
योगेश मिसाळ यांचा पुढाकार
हा स्तुत्य उपक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते योगेश मिसाळ यांनी पुढाकार घेतला. सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र आणून, सोबत घेऊन चालणारा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या पुढाकारामुळे गावातील सामाजिक सलोखा अधिक दृढ झाला असून, या उपक्रमाचे सर्व स्तरांतून भरभरून कौतुक होत आहे. याप्रसंगी गावातील हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



