देऊळगाव राजा : दहावी-बारावी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर!

बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून; दहावीची १५ फेब्रुवारीपासून
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
देऊळगाव राजा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची (HSC) लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी २०२७पासून, तर इयत्ता दहावीची (SSC) लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी २०२७पासून सुरू होणार आहे.
बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२७, तर दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे. दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षांचे वेळापत्रकही मंडळाने जाहीर केले आहे. विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
देऊळगाव राजा तालुक्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची नोंद करून अभ्यासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.



