क्राईमगुन्हेगारीबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

महावितरणाचा निष्काळजीपणा नडला: रस्त्यावर लटकणाऱ्या जिवंत तारेने घेतला निष्पाप शेतकऱ्याचा बळी:

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे

दि.१७/९/२०२६.

संग्रामपूर तालुक्यातील सावळा परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. सुभाष जाधव हे आपल्या दुचाकीने शेवगा(शेत खेडा) रस्त्यावरून त्यांच्या शेतात जात असताना रस्त्यावर लटकत लटकत असलेल्या विद्युत वाहिनीचा जोरदार शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण सावळा परिसरात मोठी खळबळ असून शेतकरी वर्गातून तीव्र संताप व दुःख व्यक्त होत आहे.

शेतात जात असताना काळाचा घाला:
दुपारच्या सुमारास शेतकरी सुभाष नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे कामासाठी निघाले होते. मात्र रस्त्यावर झाडाझुडपात अर्धवट लटकलेल्या जिवंत विज ताराचा अंदाज न आल्याने मोटर सायकल असतांनाच त्यांचा या ताराशी संपर्क आला असता विजेचा जोरदार धक्का (शॉक) बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.
४६. वर्षीय सुभाष जाधव यांच्या या अचानक आणि धक्कादायक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात त्यांची आई. पत्नी. दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे आणि वेळीच तुटलेल्या तारा दुरुस्त न केल्यामुळे एका निष्पाप शेतकऱ्याचा बळी गेल्याची संतप्त भावना स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button