गणेशोत्सव २०२६; मिरवणुकीतील वाहनांची २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान तालुकास्तरावर होणार तपासणी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
बुलढाणा, दि.16 : श्री गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीतील वाहनांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, खामगाव यांच्या वतीने विशेष वाहन तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार ही कारवाई केली जात आहे. खामगाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील ६ तालुक्यांमधील (खामगांव, शेगांव, मलकापूर, नांदुरा, जळगांव जामोद व संग्रामपूर) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मिरवणुकीसाठी वापरण्यात येणारी वाहने दिनांक २१ सप्टेंबर २०२६ ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ठरवून दिलेल्या ठिकाणी तपासणीसाठी आणणे अनिवार्य आहे. वाहनांची तपासणी करताना सर्व वैध कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे.
तालुकानिहाय वाहन तपासणीची ठिकाणे:
• खामगाव तालुका: उप प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसर, खामगाव
• शेगाव तालुका: पोलीस स्टेशन, शेगाव
• नांदुरा तालुका: विश्रामगृह, नांदुरा
• मलकापूर तालुका: पोलीस स्टेशन, मलकापूर शहर
• जळगाव जामोद तालुका: विश्रामगृह, जळगाव जामोद
• संग्रामपूर तालुका: विश्रामगृह, संग्रामपूर
सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या मिरवणुकीतील वाहनांची तपासणी वेळेत करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, खामगाव यांनी केले आहे.



