पंजाब नॅशनल बँकेकडून सावदा पोलीस ठाण्याला २१ बॅरिकेड्स भेट

सामाजिक बांधिलकीतून पोलीस प्रशासनाला मदतीचा हात; वाहतूक नियंत्रणासह बंदोबस्तासाठी होणार उपयोग
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
रावेर ता विकास आमोदकर
सावदा | प्रतिनिधी
सावदा शहरातील वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक सुरक्षेला अधिक प्रभावी करण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या वतीने सावदा पोलीस ठाण्याला २१ बॅरिकेड्स प्रदान करण्यात आले. बँकेच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमातून हे साहित्य पोलीस प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले.
शहरात विविध धार्मिक, सामाजिक तसेच सार्वजनिक कार्यक्रमांच्या वेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असते. अशा वेळी वाहतूक नियंत्रण, गर्दीचे नियोजन तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बॅरिकेड्सचा उपयोग होणार आहे.
पोलिसांच्या दैनंदिन बंदोबस्ताच्या कामात आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करून देत पंजाब नॅशनल बँकेने सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका बजावली आहे. या उपक्रमामुळे पोलीस प्रशासनाला प्रत्यक्ष कामकाजात मदत होण्याबरोबरच शहरातील वाहतूक व सुरक्षाव्यवस्था अधिक सुकर होण्यास हातभार लागणार आहे.
बँकेच्या या सामाजिक उपक्रमाचे नागरिक व पोलीस प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले.



