बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

पत्रतपस्वी स्व. भोजराज नरहरी गाडेकर अभिवादन सोहळापाच पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकारिता कार्यगौरव पुरस्कार जाहीर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी-संजय खेडेकर

चिखली-दि. ११ विदर्भ न्यायचे संस्थापक संपादक दिवंगत पत्रकार भोजराज नरहरी गाडेकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त साखरखेर्डा येथे अभिवादन सोहळ्यानिमित्त पाच पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकारिता कार्यगौरव पुरस्कार २०२६जाहीर करण्यात आला असून पत्रतपस्वी स्व भोजराज नरहरी गाडेकर यांच्यावर आधारित पत्रतपस्वी या पुस्तकाचे प्रकाशन तथा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
हा समारंभ शनिवार दि १२सप्टेंबर २०२६ रोजी जगद्गुरू पलसिध्द धर्मपिठाच्या सभागृहात सकाळी १० वा. जिल्हा जगद्गुरू पलसिध्द महास्वामींपिठाचे, शिवाचार्य रत्न सिध्दलिंग शिवाचार्य महाराज, मठाधिपती सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज पोलीस अधीक्षक निलेशजी तांबे, बुलडाणा अर्बन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ सुकेश झंवर, प्रख्यात कवी तथा निवेदक अजीम नवाज राही यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

या पत्रकारांचा होणार गौरव
खामगाव येथील राजू रामश्चंद तोटे, देऊळगाव राजा येथील सुषमा शंकरराव राऊत, बुलडाणा येथील सुखनंदन शिवराम इंगळे, यवतमाळ येथील राजाभाऊ किसनराव दवणे, बिबि येथील मधुकर मोहिते या पाच पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकारिता कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. असे आवाहन स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ बाळासाहेब गावंडे यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button