येत्या १३ ला शेगाव तहसिलवर धडकणार शेतकरी एल्गार मोर्चा – गजानन बिल्लेवार

येत्या १३ ला शेगाव तहसिलवर धडकणार शेतकरी एल्गार मोर्चा – गजानन बिल्लेवार
श्याम पहूरकर
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव विशेष न्युज रिपोर्टर
शेगाव – शेतकऱ्यांना 2022 चा विमा शासनाकडून मिळाला नसून काही शेतकऱ्यांना मिळाला तो तटपुंज स्वरूपात मिळाला त्यामुळे संघटनेची आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी साठी शेगाव विश्रामगृह येथे शेतकरी क्रांति संघटना अध्यक्ष गजानन बिल्लेवार यांच्या नेतृतवाखाली बैठक संपन्न झाली. २०२० मध्ये ३ कोटी ५१ लाख रू विमा मंजूरात मिळाली होती. परंतु अद्यापही शेतकऱ्याला मिळाला नाही. तसेच
१८ जून २०२२ रोजी शेगाव तालुक्या मध्ये अतिदृष्टी झाली.ही बाब लक्षात घेऊन शासनाचे शेतीच्या नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे संबधित अधिकाऱ्यांनी करून घेतले.परंतु शेतकऱ्यांना काही विमा मिळाला नाही. ७२ तासाच्या आत शासनाच्या कंपनीच्या जी.आर.नुसार ऑनलाईन तक्रार नोंदवण्यात आली. परंतु ७२ तास उलटून सुध्धा शेतकऱ्याच्या खात्यात विमा रक्कम का जमा झाली नाही.असा प्रश्न देखील आमचा सरकारला आहे. शेतकऱ्यांच्या विम्याची लढाई असेल तर शेतकऱ्यांना एकजूट व्हायला पाहिजे प्रत्येक शेतकरी हा कोणत्याना कोणत्या पक्षाशी संबंधित असतो त्याने पक्षाशी संबंधित न राहता आपली एकच जाते म्हणजे शेतकरी होय हे लक्षात घेऊन आपल्या पक्षाची झेंडे आणि दांडे बाजूला ठेवून एकजूट व्हायला हवं.
शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा न झाल्यास हजारो शेतकरी कृषी मंत्री यांच्या बंगल्यासमोर मोर्चा नेऊन शेतकरी एकजुटीची ताकद शासनाला आपण दाखवून देऊ. ज्या दिवशी तुम्ही पेटून उठसाल त्या दिवशी तुमचा हक्क तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही. आमचा हक्काचा विमा आम्हाला जर मिळाला नाही तर,शेतकऱ्यांच्या हातात रुमन घेऊन शासनाला धडा शिकवल्या शिवाय आम्ही गप्प बसणार राहणार नाही. असा गंभीर इशारा त्यांनी दिला.13 12 2022 रोजी बारा वाजता तहसील कार्यालय शेगाव येथे शेतकरी क्रांती संघटनेच्या विद्यमाने शेतकऱ्यांचा भव्य एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी घोषणा अध्यक्ष गजानन बिलेवार यांनी केली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अशोकराव शेळके तर प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शक गजानन बिलेवार शेतकरी क्रांती संघटना अध्यक्ष तसेच प्रमुख उपस्थितीत एकनाथराव भगत मोहम्मद शौखतआणि भारत कंकाळ यांच्या उपस्थितीत झाली. तसेच बैठकीला नईम खान रूम खान,सुनील घाटोळ, विनोद तिव्हाने, विना विनायक पुलकर, रवी खारोडे, युवा जिल्हाप्रमुख संतोष अडकणे,किशोर शेळके,गोपाल गावंडे, गोपाल ढगे, श्रीकृष्ण हाडोळे,सुधाकर मसणे, महादेव भारसाकळे,रामेश्वर अरुण गुरव राजू इत्यादी संघटनेचे पदाधिकारी व शेकडो शेतकरी हजर होते.





