बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

चिखली तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस, सा.आवाज न्यायाचा
चिखली तालुका प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे

 तालुका किसान काँग्रेसची सरकारकडे  मागणी
 
चिखली : गेल्या जवळपास महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे ठाकले आहे. पावसाअभावी शेतातील उभी पिके करपण्याच्या अवस्थेत असून, शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर संकटाचे सावट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर चिखली तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी चिखली तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष अध्यक्ष समाधान आकाळ यांनी ११ सप्टेंबर रोजी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शेतकऱ्यांनी कर्ज काढून मोठ्या आशेने खरीप हंगामाची पेरणी केली. सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे पिकांची उगवण चांगली झाली आणि यंदा उत्पन्न चांगले मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र त्यानंतर पावसाने अचानक पाठ फिरवल्याने पिकांना आवश्यक असलेला ओलावा मिळत नसून अनेक भागांत पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत.

आभाळाने पाठ फिरवली, पिकांनी माना टाकल्या… आता शासनाने शेतकऱ्यांच्या मदतीला धावून यावे, अशी आर्त हाक देत किसान काँग्रेसने प्रशासनाचे लक्ष या गंभीर परिस्थितीकडे वेधले आहे. पिकांची अवस्था पाहून शेतकऱ्यांसमोर पिके वाचतील का, कर्ज फेडता येईल का आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? असे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.
तहसील प्रशासनाकडे चिखली तालुक्यातील सर्व गावांमध्ये पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने पंचनामे करावेत, तसेच उपलब्ध पर्जन्यमान आणि पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ आढावा घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

 परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन चिखली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा,
यासोबतच पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार दुष्काळी सवलती, पीक नुकसानभरपाई, पीकविमा आणि अन्य आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 याप्रसंगी चिखली तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष समाधान आकाळ, न.प.विरोधी पक्षनेता डाॅ.मोहमंद इसरार, कृषीमीत्र सचिन बोंद्रे, ईश्वरराव इंगळे, संतोष देशमुख, समाधान गिते, सर्जेराव ठेंग, गणेश ठेंग, गणेश जवंजाळ, शिवा म्हस्के, शेख खैरूभाई, नासेर सौदागर, शेषराव अंभोरे पाटील,विकास अंभोरे, दत्ता करवंदे, योगेश ढोरे, प्रल्हाद आकाळ, संजय गिरी, लक्ष्मण भिसे, निलेष सोळंकी, पुरूषोत्तम हाडे, भगवान तुकाराम सोळंकी, बंडु भुसारी, देवेद्र भुसारी, प्रशात पाटील, अकील खान, अनिल जुमडे, अमर इंगळे, मोहमंद अब्रार भाई, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button