जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्ररावेरविदर्भ

.अखिल भारतीय गाडी लोहार समाजाचा गुणगौरव सोहळा रावेर येथे दिमाखात संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस रावेर ता प्रतिनिधी विकास आमोदकर

समाजभवनासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे आश्वासन

रावेर, दि. ६ सप्टेंबर : अखिल भारतीय गाडी लोहार समाज महामंडळ, धुळे तसेच रावेर गाडी लोहार समाज प्रगती मंडळ, रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणगौरव व सन्मान सोहळा माजी सैनिक बहुउद्देशीय सभागृह,रावेर येथे उत्साहपूर्ण व दिमाखदार वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. सुरेश शामलाल लोहार होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मा. ना. श्रीमती रक्षा खडसे उपस्थित होत्या. रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. आ. श्री. अमोलभाऊ जावळे,नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार मा. आ. श्री. नंदकिशोरभाऊ महाजन, रावेरशहराचे पोलीस निरीक्षक मा. श्री. संदीप पाटील होते यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय गाडी लोहार महासंघाचे अध्यक्ष मा.प्रदीप लोहार माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, अंबिका व्यायाम शाळा अध्यक्ष भास्कर महाजन,माजी नगराध्यक्ष शितल पाटील रावेर शिक्षण संवर्धक संघाचे चेअरमन संतोष अग्रवाल, अध्यक्ष देवेंद्र मिसर, उपाध्यक्ष डॉ राजेंद्र आठवले, विकास देशमुख, तुषार मानकर, पुरुषोत्तम लोहार, ताराचंद लोहार, आत्माराम लोहार, मनोहर लोहार,पंडित लोहार यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते.

गुणवंतांचा गुणगौरव व सन्मान
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भगवान विश्वकर्मा यांच्या पूजनाने झाली. प्रास्ताविक अखिल भारतीय गाडी लोहार महासंघाचे अध्यक्ष प्रदीप लोहार यांनी केले. यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती तसेच समाजासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गुणगौरव व सन्मान करण्यात आला. रावेर गाडी लोहार समाज प्रगती मंडळ रावेर चे अध्यक्ष विजयलाल लोहार यांनी आपल्या मनोगतात यापुढेही समाज हितासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानस आहे असे सांगितले तसेच व्यासपीठावरील
मान्यवरांनी मनोगतातून गाडी लोहार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.

समाजभवनासाठी जागा देण्याचे मा.ना.रक्षाताई खडसेंसहित आमदारांचे आश्वासन
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आपल्या मनोगतात गाडी लोहार समाजाच्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करत त्यांनी रावेर येथे समाजभवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. समाजभवनामुळे समाजातील विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांना कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये रावेर गाडी लोहार समाज प्रगती मंडळाचे अध्यक्ष विजयलाल सुंदरलाल लोहार, उपाध्यक्ष राजू लोहार, सचिव विशाल रमेश राठोड, खजिनदार सचिन सुभाष लोहार तसेच सर्व कार्यकारी मंडळ सर्व समाज बांधव भगिनी यांनी परिश्रम घेतले.

“समाजाची एकजूट हीच आमुची वज्रमूठ” या भावनेतून पार पडलेल्या या गुणगौरव सोहळ्याला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमामुळे रावेर परिसरातील गाडी लोहार समाजात नवचैतन्य निर्माण झाले असून, समाजाच्या विकासासाठी एकजुटीने पुढे जाण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाजातील बंधू-भगिनी उपस्थित होते

रावेर गाडी लोहराध्यक्ष विजय लाल लोहार यांनी महासंघाच्या प्रमुख मान्यवरांचे व समाज माता भगिनी यांचे स्वागत केले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश गोहेल आभार विशाल राठोड यांनी केले तर नीरज लोहार यांनी छायाचित्रण केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button