जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

मनात जिद्द आणि अभ्यासूवृत्ती असेल तर हमखास यशाचे शिखर गाठता येते – थुटटे

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी -संजय खेडेकर

चिखली -दि.८

मनात जिद्द आणि अभ्यासू वृत्ती असेल तर हमखास यशाचे शिखर गाठता येते. असे उदगार भरोसा येथील प्रगतशील शेतकरी विष्णू थुटटे यांनी काढले. ‌‌

ते चिखली शहरातील गजानन नगरात वास्तव्यास असलेल्या राज्यस्तरीय आदर्श क्रीडा पुरस्कार प्राप्त शिक्षक दिलीप लांडकर यांच्या निवासस्थानी एका कौटुंबिक कार्यक्रमात बोलत होते.

नुकत्याच जाहीर झालेल्या शिक्षक भरती मध्ये पोर्टल द्वारे शिवदीप लांडकर व कुमारी अंजली लांडकर या बहिण भावाची निवड झाल्याबद्दल त्यांचा कौटुंबिक सत्कार करण्यात आला.

तालुक्यातील शिवशंकर विद्यालय भरोसा येथील सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक तसेच राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त माझी चिखली तालुका शालेय क्रीडा स्पर्धा संयोजक विद्यार्थी प्रिय क्रीडा शिक्षक दिलीप लांडकर यांचा मुलगा शिवदीप लांडकर यांची पवित्र पोर्टल द्वारे जिल्हा परिषद अमरावती येथे शिक्षक म्हणून निवड झाली तसेच त्यांची मुलगी कुमारी अंजली दिलीप लांडकर हिची पवित्र पोर्टल द्वारे जिल्हा परिषद पुणे येथे शिक्षिका म्हणून निवड झाली . दोन्हीही भाऊ-बहीण हे एम एस सी भौतिकशास्त्र विषयात उच्चशिक्षित आहेत. .त्याचबरोबर सेट परीक्षा सुद्धा उत्तीर्ण झालेले आहेत. विशेष म्हणजे दोघांचेही प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा मेरा भरोसा येथे झाले आहे. पुढील शा बीएससी पर्यंतचे शिक्षण श्री शिवाजी विद्यालय व श्री शिवाजी सायन्स कॉलेज चिखली येथे झालेआहे .

   अमरावती येथे एम एस सी फिजिक्स पर्यंत शिक्षण झाले असून त्यांनी त्यांनी कुठलेही बाहेरगावी महागडी फी असलेले शिकवणी वर्ग लावले नाही.आपल्या चिखली येथील निवास स्थानीच मनात जिद्द आणि अभ्यासूवृत्तीच्या बळावर यशाचे शिखर गाठले आहे. दोन वर्षांपूर्वी दिलीप लांडकर यांचा मोठा मुलगा सुरज लांडकर यांची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून महसूल अधिकारी म्हणून निवड झाली असून तो सध्या सिल्लोड तालुक्यात महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहे .

  आजच्या स्पर्धेच्या युगात तीनही मुलांची शासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल दिलीप लांडकर व सौ सुनीताताई लांडकर यांचे    पत्रकार अंकुश पाटील व विष्णू थुटटे यांनी  अभिनंदन करून सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button