महाराष्ट्रविदर्भ

वाशिम स्टेशन परिसरात रेल्वे रुळावर रील बनवणाऱ्या तरुणावर आरपीएफ कडून कारवाई

स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस

वाशिम: प्रतिनिधी

रेल्वे रुळावर उभे राहून रील बनविण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई केली ६ सप्टेंबररोजी सकाळी ११ ०३ वाजता रेल्वे प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती मिळाली.
वाशिम रेल्वे स्थानक परिसरात एका अज्ञात व्यक्तीने रेल्वे रुळावर अनधिकृतपणे प्रवेश करून सोशल मीडिया रील बनविल्याची तक्रार सोशल मीडियावर व्हायरल झाली होती या प्रकरणी ६ सप्टेंबर रोजी रेल्वे कायदा १९८९ मधील कलम१४७ व १४५ अंतर्गत गुन्हा क्रमांक ३०३/२६ दाखल करण्यात आला.
त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी आरपीएफचे एएसआयपीएफ सलिम खान यांनी तपास व चौकशी सुरू केली सोशल मीडिया खात्याच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यात आली अमोल यादव नवघरे (वय २९ रा. पांगरी नवघरे ता. मालेगाव जि. वाशिम) असे त्याचे नाव आहे.
त्यानंतर आरपीएफ पथकाने पांगरी नवघरे येथे जाऊन अमोल नवघरे याला ताब्यात घेत आरपीएफ पोस्ट, वाशिम येथे आणले. चौकशी पूर्ण केल्यानंतर रेल्वे कायद्यानुसार आवश्यक कारवाई करण्यात आली. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावून त्याची सुटका करण्यात आली.
रेल्वे रुळावर विनापरवानगी प्रवेश करून रील अथवा व्हिडिओ बनविणे धोकादायक असून अशा प्रकारांवर रेल्वे सुरक्षा दलाकडून कारवाई केली जात आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button