बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

वर्षावासनिमित्त हिंगणा येथे सुरेखाताई बर्वे यांची सदिच्छा भेट….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गवांदे जळगाव जामोद

हिंगणा:- ८ सप्टेंबर २०२६
महिला प्रशिक्षण शिबिराच्या अनुभवातून बौद्ध धम्म व संस्कारांचे मार्गदर्शन
वर्षावासनिमित्त हिंगणा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सुरू असलेल्या विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांना भेट देण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा, नाशिक येथील महिला विभागाच्या माजी जिल्हाध्यक्षा तथा संस्कार उपाध्यक्षा आणि समता सैनिक दलाच्या सैनिक आयुष्यमाननी सुरेखाताई बर्वे यांनी सदिच्छा भेट दिली. आयुष्यमाननी सुरेखाताई बर्वे या पदस्पर्शभूमी पातुर्डा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहा दिवसीय महिला प्रशिक्षण शिबिरामध्ये शिबिरप्रमुख म्हणून उपस्थित होत्या. या शिबिरादरम्यान त्यांनी हिंगणा या छोट्याशा गावाला भेट देऊन उपस्थित महिला व नागरिकांना बौद्ध धम्म, संस्कार आणि सामाजिक प्रबोधनाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी आद. बौद्धाचार्य मिलिंद एन. वानखडे, जिल्हा संस्कार सचिव, आयु. कैलास दाभाडे, अध्यक्ष पदस्पर्शभूमी पातुर्डा, तसेच सुजाता महिला संघ, पदस्पर्शभूमी पातुर्डा यांची उपस्थिती होती.
हिंगणा येथे आगमन झाल्यानंतर सुजाता महिला संघ हिंगणा यांच्या वतीने आयुष्यमाननी सुरेखाताई बर्वे यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तसेच आद. बौद्धाचार्य मिलिंद एन. वानखडे, आयु. कैलास दाभाडे आणि सुजाता महिला संघ, पदस्पर्शभूमी पातुर्डा यांचेही यावेळी स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान सुरेखाताई बर्वे यांनी महिला सक्षमीकरण, बौद्ध धम्माचे आचरण, सामाजिक एकोपा आणि संस्कारमय जीवन याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हिंगणा येथील महिला व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आयुष्यमाननी सुरेखाताई बर्वे यांनी हिंगणा येथील महिला व नागरिकांशी संवाद साधत भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रसार, बौद्ध धम्माचे आचरण, महिलांचे संघटन व सामाजिक प्रबोधन याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे उपस्थित महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. या सदिच्छा भेटीमुळे हिंगणा गावातील वर्षावासाच्या उपक्रमाला अधिक बळ मिळाले असून, बुद्ध धम्माचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button