रस्त्यावरील स्पीडब्रेकर निघाल्याने जड वाहन आणि ट्रक यांना आलाय वेग. नागरिकांना मात्र चिंता……..

साप्ताहिक आवाज न्यायचा
(ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर)
नेरूळ: नेरूळ येथील सर्विस रोड येथे कायम वाहतूक जोरात चालू असते. रस्त्यावरील स्पीडब्रेकर मुळे काही प्रमाणात का होईना रस्ता क्रॉस करत नागरिक आपापल्या काम करिता जातात. परंतु आता सीएनजी ते उरण फाटा या रोडवरील स्पीडब्रेकर निघाल्याने ट्रक चालक आणि कंटेनर चालक यांचा गाडीचा वेग वाढला असून यामुळे एखादी गंभीर घटना घडू शकते असे झाले आहे. याकडे नवी मुंबई महानगरपालिकेचे पूर्ण दुर्लक्ष्य होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याच रोडणे रमेश मेटल कोरी एरिया असून सकाळी लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जातो. परिणामी हे स्पीडब्रेकर निघाल्याने कधी अपघात घडेल सांगता येत नाही. याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे झाले असून नवी मुंबई महापालिकेच्या मार्फत हे स्पीडब्रेकर लवकरात लवकर नवीन तयार करण्यात यावे. जेणेकरून नागरिकांना होणारा धोका काही प्रमाणात कमी होईल. असे न झाल्यास या ठिकाणी कधीही गंभीर घटना घडू शकते. याची शक्यता नाकारता येत नाही….



