५८ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव शहरातील भूत बंगला परिसरात ५८ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. ७) सकाळी घडली. या प्रकरणी शेगाव शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय प्रल्हाद चव्हाण (वय ५८, रा. भूत बंगला, शेगाव) यांनी रविवारी सकाळी अंदाजे ९ ते ११.३० वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरात पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे भाचे प्रसाद संतोष डांगे (वय २१, रा. भूत बंगला, शेगाव) यांनी शेगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
या प्रकरणी पोलिसांनी कायम मर्ग क्रमांक ५७/२०२६, कलम १९४ बीएनएसएसनुसार अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावंडे करीत आहेत. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे
………..✍️



