मोटरसायकल आणि बोलेरो ची जोरदार धडक.मायलेकीचा जागीच मृत्यू.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे
दि.३०/८/२०२६.
२८ ऑगस्ट च्या सायंकाळी टूनकि लाडणापूर रोडवरील दूध in डेअरी समोर एका बोलेरो ने मोटर सायकल मिशन धडक दिली. यात एका चिमुकलीसह तिचा आईचा मृत्यू झाला तर मोटर सायकल चालक मामा आणि भासा गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार राज्य महामार्ग क्रमांक ४७. वरील टूनकि लाडणापूर रोडवर हा अपघात झाला. बोलेरो आणि मोटरसायकल यांच्यांत हे धडक झाली. धडक एवढी भीषण होती की मोटर सायकल २०० फुट अंतरावर फेकली गेली असल्याने चिमुकलीचे शिर आणि धड बाजूला झाले. झालेल्या या भीषण अपघातामुळे जमलेल्या नागरिकांनी बुलेरो चालकाला गाडी बाहेर ओढून. बेदम मारहाण करून गाडीला पेटवून दिले.
या अपघातात उर्मी उर्फ पूर्वी संजय वास्कले वय (७) महिने आई सपना संजय वास्कले वय (२८) वर्ष रा. जसादी.ता. शहापूर.जि. बुरहानपुर. (मध्यप्रदेश) त्यांचा मुलगा सनविर संजय वास्कले वय ३ वर्ष. आणि कमलेश भुरा जंगल रा. बोरवा हे दोघे मामा आणि भाचा जखमी झाले त्यांच्यावर उपचार चालू आहे.
सपना ह्या आपल्या भावासोबत त्यांच्या माहेरी बोरवा येथे रक्षाबंधन साजरी करण्यासाठी जात असतात त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा समीर आणि मुलगी वरून हे होते. याच दरम्यान लाडनापुर टूनकि रोडवर समोरून येणाऱ्या बुलेरो ने मोटर सायकल ला जोरात धडक दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी हिरालाल अनारसिंग वास्कले वय 37.रा. उसरा.ता. जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा यांच्या तक्रारीवरून बुलेरो चालक रवी गोखले यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास सोनाळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप काळे करीत आहे.
टूनकि ते लाडनापुर या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे एका बाजूने सिमेंटचा रस्ता तयार आहे. दुसऱ्या बाजूला रस्ता खोदून ठेवण्यात आला असून बांधकाम बाकी आहे. तरी देखील वाहन चालक बेधडकपणे वाहने चालवितात. अशातच एका बोलेरो चालकाने कुठलाच न विचार करता दोन निष्पाप जीवांचा बळी घेतला.
रक्षाबंधन अशा सणासुदीच्या दिवशी मायलेकीच्या मृत्यूने सर्वत्र परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




