बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेतीपंपाकरिता शेतकऱ्यांना पूर्ण 12तास वीज देण्यात यावी; अशी मागणी अध्यक्ष भाजपा विद्यार्थी आघाडी प्रतीक समाधान मुंढे पाटील यांनी केली.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी: गजानन तांगडे खामगांव

खामगाव तालुक्यातील ढोरपगांव येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीत संपूर्ण पैसा तसेच कर्ज काढून शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.
सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे मशागत केली आहे. परंतु पिके चांगली उगवलेली असून तसेच फुले व दाणे भरण्याच्या अवस्थेत असून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
हाती आलेली पिके वाचविण्यासाठी शेतकरी विहिरीतील उपलब्ध पाणी पिकांना देण्यासाठी आटापिटा करीत आहे. परंतु अपुऱ्या व कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्यामुळे पाणी उपलब्ध असून सुद्धा शेतकऱ्यांना कृषी पंप चालू शेतकऱ्यांना पाणी देता येत नाही.
त्यामुळे शेतकरी मोठा संकटात सापडला आहे.निसर्ग आपल्या हातात नाही मात्र, या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आवश्यक वीज पुरवठा उपलब्ध करून देणे ही संबंधित यंत्रणेची जबाबदारी आहे.
शेतकरी वारंवार वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्याकडे पूर्ण दाबाच्या वीज पुरवठ्याची मागणी करीत आहे मात्र अपेक्षित कारवाई होत नसल्याने शेतकरी हैराण झाले असून पिकांना वेळेवर पाणी न मिळाल्यास हाती आलेले पीक हातचे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
शेतातील कृषी पंपांना किमान दिवसा 12 तास दर्जेदार व पूर्ण दाबाचा वीज पुरवठा मिळणे आवश्यक आहे तसेच एखाद्या दिवशी विद्युत वाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास ज्या कालावधी मध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
तेवढा वेळ अतिरिक्त वीज पुरवठा देऊन भरून काढण्यात यावा.दि.26/08/2026 रोजी ढोरपगांव येथील कृषी पंपांना केवळ दोन तास विद्युत पुरवठा करण्यात आला त्यानंतर विद्युत वाहिनीवरील तार तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
त्यामुळे कृषी पंपांना निर्धारित वेळेच्या तुलनेत अत्यंत कमी वीज पुरवठा मिळाला. अशा परिस्थितीत तार जोडून विद्युत पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर खंडित झालेला उर्वरित वेळ अतिरिक्त वीज पुरवठा देऊन भरून काढण्यात यावा.
मात्र प्रत्यक्षात अशा प्रकारे वीज पुरवठ्याची तूट भरून काढण्यासाठी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्याकडून व कर्मचाऱ्याकडून योग्य ती कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना स्पष्ट सूचना देण्यात याव्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीची तातडीने दखल घेऊन ढोरपगांव येथील शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी पूर्ण दाबाची किमान 12 तास वीज उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच सिंगल फेज वीज पुरवठा तातडीने सुरू करण्यात यावा, वरील मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात.
अन्यथा समस्त शेतकरी बांधवांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची संबंधित प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी. शेतकऱ्यांच्या पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सदर निवेदनावर तातडीने कारवाई करावी. अशी मागणी ढोरपगांव येथील शेतकऱ्यांनी केली आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button