बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

राजेंद्र बघे यांच्या मध्यस्थीने तरोडा कसबा टोलनाक्यावरील काम बंद आंदोलन स्थगित

जी .डी. रोकडे बुलढाणा

जिल्हा प्रतिनिधी

खामगाव : तरोडा कसबा टोलनाक्याअंतर्गत कार्यरत मेंटेनन्स मजूर कामगारांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू करण्यात आलेले काम बंद आंदोलन दि. २३ ऑगस्ट रोजी शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांच्या यशस्वी मध्यस्थीने स्थगित करण्यात आले. बघे यांनी मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टर राजेश हबीब यांच्याशी चर्चा करून कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढला.

तरोडा कसबा टोलनाक्याअंतर्गत मेंटेनन्सचे काम करणाऱ्या मजूर कामगारांना वेतनवाढ देण्यात यावी, कामगारांचा विमा काढण्यात यावा,तसेच वेतन दरमहा कामगारांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे,अशा प्रमुख मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या होत्या. याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खामगाव तहसीलदारांना निवेदन देऊन काम बंद आंदोलन सुरू केले होते.

दरम्यान, आंदोलनाची दखल घेत शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांनी मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्टर राजेश हबीब यांच्याशी संपर्क साधून कामगारांच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली.चर्चेतून कामगारांच्या प्रमुख मागण्या पूर्ण करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू असलेले काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आले.
शिवसेनेचे वतीने देवेश लोखंडकार,शिवसेना उप तालुकाप्रमुख गोपाल भिल, विभाग प्रमुख चेतन शलकर, विभागप्रमुख आकाश माने,पोलीस विभागाच्या वतीने जाधव साहेब व कर्मचारी उपस्थित होते.

या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी केले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख योगेश घोंगे, अविनाश कोकाटे, भगवान भोपळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व मेंटेनन्स कामगार देवानंद तायडे,गजानन तुळशीराम हिंगने,रामेश्वर सुनील सिंग पवार,संदिप देवीदास कोरडे, सुभाष भास्कर मोरे,कौतिकराव खंडारे,प्रकाश काटे,अंबादास कवळकार,सुरेश तेलगोटे,दिपक खंडारे, शंकर घोंगे,समाधान कवळकार,संदिप काळे,केशव भालटिळक,गजानन पेसोड,रोशन गुर्दे,शुभम गुर्दे उपस्थित होते.

कामगारांना योग्य वेतन, विमा संरक्षण आणि नियमित वेतन मिळावे, या मागण्यांसाठी संघटनेने भूमिका घेतली होती.राजेंद्र बघे यांच्या मध्यस्थीमुळे आंदोलनावर सकारात्मक तोडगा निघाल्याने कामगारांना दिलासा मिळाला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button