महाराष्ट्र

वर्ष 2022 चा पिक विमा शेतकऱ्यांना द्या गजानन बिल्लेवार याची मागनी

श्याम पहुरकरस्टार भारत लाईव्ह शेगाव विशेष न्यूज रिपोर्टर

*वर्ष 2022 चा पिक विमा* *शेतकऱ्यांना द्या गजानन बिल्लेवार*याची मागनी* चालू वर्षाला अतिवृष्टीमुळे शेगावतालुक्यात शंभर टक्के नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी शासन निर्णयानुसार 72 तासाच्या आत ऑनलाईन तक्रारी देखील दाखल केल्या असून त्यानुसार वैयक्तिक स्तरावर कंपनीकडून व कृषी विभागाच्या प्रतिनिधीकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे सुद्धा करण्यात आले. सोयाबीनचे विमा संरक्षित रक्कम 38500 रुपये हेक्टर असून त्यावर नुकसानीचे टक्केवारीनुसार पैसे मिळायला पाहिजे होते. ते मिळाले नसून केवळ शेतकऱ्यांना एकरी 400 ते 500 रुपये या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान देऊन एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टा केली असून जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांना हक्काचा पिक विमा मिळवून द्यावा. अशा प्रकारची मागणी शेतकरी क्रांती संघटनेचे अध्यक्ष गजानन बिलेवार व युवा जिल्हाध्यक्ष संतोष अडकणे यांनी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना केलेले आहेत. अशा प्रकारची प्रतिलिपी कृषिमंत्री. कृषी आयुक्तालय. व पालकमंत्री बुलढाणा यांना केलेली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button