अकोलाबुलढाणाविदर्भशैक्षणिक

लोकजागर मंचतर्फे शालेय साहित्य वाटप करून भाऊसाहेब फुंडकरांना अभिवादन

हिवरखेड (वार्ताहर )महाराष्ट्राचे माजी कृषिमंत्री, उत्कृष्ट संसदपटू स्व भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त लोकजागर मंचतर्फे शालेय साहित्य वाटप करून भाऊसाहेब फुंडकर यांना आगळ्या वेगळ्या प्रकारे अभिवादन करण्यात आले. एकविस ऑगस्ट स्व. भाऊसाहेब फुंडकर यांचा वाढदिवस या दिवसाचे औचित्य साधून लोकजागर मंचचे संस्थापक अनिल गावंडे यांनी महेंद्र कराळे यांच्या संकल्पनेतून येथील जि. प. प्राथमिक मुलींच्या शाळेला टीव्ही संच व एकशे दहा विद्यार्थ्यांना पाण्याची बॉटल व ओळखपत्र वाटप केले तर कस्तुरबा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना कंपास पेटीचे वाटप केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल कराळे होते तर रमेश दुतोंडे, चंद्रप्रकाश राऊत, रामेश्वर शिंगणे, प्रा. गौतम इंगळे, दानिश खान, मनिष भुडके, मनोज राठी, डॉ. प्रा. मयुर लहाने,राजेश बुरघाटे, पत्रकार गजानन राठोड यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना अनिल गावंडे यांनी भाऊसाहेब फुंडकरांचे कार्य समजावून सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महेंद्र कराळे यांनी लोकजागर मंचचे कार्य व भूमिका स्पष्ट केली तर भाजपाचे नेते रमेश दुतोंडे यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून शैक्षणिक समस्या सोडवण्याची ग्वाही दिली.दोन्ही शाळेमध्ये अनिल गावंडे यांचा शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व जि. प. मुलींच्या शाळेत त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रमेश व्यवहारे, अरुण राहाणे, पंकज देशमुख, अभिजित ढोकणे,तुषार गावंडे,शिवा दिंडोकार, सुनिल धुरडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button